Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
Nobel Prize 2021 For Physics : स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन आणि जिओर्जियो पेरिसिक यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. द रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर सर्वात मानाचा समजला जाणारा यंदाच्या वर्षातील भौतिकशास्त्रील नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली. स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन आणि ज्योर्जियो पेरिसिक यांचा नोबेल पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. द रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सतर्फे हा पुरस्कार हवामान आणि क्लिष्ठ भौतिक प्रणालीतील (complex physical system) संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 'स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' च्या समितीने ही घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी नोबेल पुरस्काराचा एक भाग रॉजर पेनरोस आणि दुसरा भाग संयुक्तपणे रेनहार्ड गेन्जेल आणि अँड्रिया गेज यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॅक होल फॉरमेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. नोबेल पुरस्काराचे महासचिव थॉमस पर्लमॅन यांनी ही घोषणा केली आहे. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदकासह 11 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख पारितोषिक आहे. हा पुरस्कार स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे देण्यात आला आहे.
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2021
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2021 #NobelPrize in Physics to Syukuro Manabe, Klaus Hasselmann and Giorgio Parisi “for groundbreaking contributions to our understanding of complex physical systems.” pic.twitter.com/At6ZeLmwa5
काल अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अॅर्डेम पटापाउटियन (Ardem Patapoutian) यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमेरिकेचे शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलिअस आणि अॅर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शामधील रिसेप्टर्सच्या संशोधनासाठी संयुक्तपणे नोबेल मेडिसीन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिग आणि पर्यावरणीय समतोल या संदर्भातील संशोधन केले आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची वाढती पातळीमुळे भूपृष्ठाचं वाढतं तापमान या विषयी अभ्यास करण्यात आला आहे
Syukuro Manabe – awarded the 2021 #NobelPrize in Physics – demonstrated how increased levels of carbon dioxide in the atmosphere lead to increased temperatures at the surface of the Earth. His work laid the foundation for the development of current climate models. pic.twitter.com/jOZEnOSxGV
— The Nobel Prize (@NobelPrize) October 5, 2021
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.