(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू
माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे.
Mali Gold Mine Collapse : पश्चिम आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. ज्या ठिकाणी नेहमीच खाण कोसळण्याचा धोका असतो, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. मालीच्या खाण मंत्रालयाने मंगळवारी याबाबत निेदन जारी केलेय. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, 'दक्षिण-पश्चिम कौलिकोरो प्रदेशातील कांगाबा जिल्ह्यात अनेक खाण कामगारांना आपले प्राण गमवावे लागले.' या दुर्घटनेबद्दल खाण मंत्रालयाने खेद व्यक्त केला आहे. त्याशिवाय खाण कामगारांना सुरक्षा आवश्यकतांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अल जजीराने खाण दुर्घटनेबाबत वृत्त दिले आहे.
दुर्घटना कशी घडली, कारण काय ? -
खाण मंत्रालयाचे प्रवक्ते बे कौलीबली यांनी या दुर्घटनेबाबत खेद व्यक्त केला. त्याशिवाय त्यांनी दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, खाण कामगारांनी सुरक्षाचे पालन न करता गॅलरी खोदली, त्यामुळे ही दुर्घटना घडली. याआधी कामगारांना अनेकदा सुरक्षा मानके लक्षात ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. तरीही कामगारांनी सुरक्षा नियमांचं पालन केले नाही. दरम्यान, माली सरकारने मृतांच्या कुटुंबियांबद्दल आणि मालीच्या लोकांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
More than 70 people have died in southwest Mali after an artisanal gold mine collapsed last week. https://t.co/W1sLsYY7gh
— Al Jazeera English (@AJEnglish) January 25, 2024
योग्य भागात खाणकाम करण्याबाबत सल्ला
अल जझीरा या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने खाणकामाच्या ठिकाणांजवळ राहणाऱ्या समुदायांना आणि सोन्याच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे सुरक्षा मानकांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय खाणकाम नेमून दिलेल्या योग्य जागेतच करण्याची सूचना करण्यात आली आहे.
BREAKING: More than 70 people are dead after an informal gold mine collapsed in Mali, an official says https://t.co/64jNS7SFJs
— The Associated Press (@AP) January 24, 2024
आणखी वाचा :
जागावाटपाचा फॉर्मुला आज ठरणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक, राजू शेट्टींना आमंत्रण नाही