एक्स्प्लोर

Putin's Girlfriend Alina Kabaeva : वयाच्या 70व्या वर्षी पुतिन पुन्हा बाबा होणार? चर्चांना उधाण

Putin's Girlfriend Alina Kabaeva : वयाच्या 70व्या वर्षी पुतिन पुन्हा बाबा होणार? चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये अनेक दावे केले जात आहेत.

Putin's Girlfriend Alina Kabaeva : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. पुतिन पुन्हा बाबा होणार असून त्यांची गर्लफ्रेंड अलिना कबाएवा लवकरच बाळाला जन्म देणार आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समधून पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना गरोदर असून पुतिन पुन्हा बाबा होणार असल्याचा दावा केला जात आहे. पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाएवा (39) पुतिन यांच्या तिसऱ्या बाळाची आई होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतिन सध्या 70 वर्षांचे आहेत. सध्या ते युक्रेनवर केलेल्या हल्यामुळे अनेकांच्या टिकेचा सामना करत आहेत. अनेक वृत्तांमधून असा दावा केला जात आहे की, पुतिन आणि अलीना यांना आधीच दोन आपत्य आहेत. तसेच, अलिना लवकरच एका लहान मुलीला जन्म देणार आहेत. 

डेलीस्टारनं क्रेमलिनमधून अपडेट केलेल्या वेब अकाउंटच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या अकाउंटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुतिन या बातमीनं खूश नाहीत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती अलिना आणि पुतिन यांच्या नात्याबाबतच्या चर्चा अनेकदा माध्यमांमध्ये होत असतात. 

एका स्थानिक वृत्तपत्रातून खुलासा करण्यात आला आहे की, अलिनानं 2015 मध्ये स्विर्त्झलँडमध्ये आणि 2019 मध्ये मॉस्कोमध्ये दोन मुलांना जन्म दिला होता. मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, अलीना रशियातील क्रेमलिन समर्थक मीडिया ग्रुपची प्रमुख आहे आणि रशियातील टॉप सेलिब्रिटींपैकी एक आहे.

जिमनॅस्टिकमधून निवृत्ती घेतल्यानंतर अलिना राजकारणात आली. इतकंच नाही तर अलिना पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षातून खासदारही झाल्या आहे. द सनच्या वृत्तानुसार, पुतिन यांची मैत्रीण अलिना यांनी एका मासिकासाठी बोल्ड फोटोळूट केलं होतं. अलिनानं गायिका होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण तिला यश मिळू शकलं नाही. 2007 ते 2014 पर्यंत, अलिना कबाएवा रशियन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या उप-राज्य ड्यूमा होत्या. याव्यतिरिक्त, सप्टेंबर 2014 मध्ये, रशियाच्या नॅशनल मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावर अलिना यांची नियुक्ती करण्यात आली होती.

खाजगी आयुष्याबाबत सावधगिरी बाळगतात पुतिन 

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देशांनीही अलिना यांच्यावर निर्बंध लादले आहेत. खाजगी आयुष्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगणाऱ्या पुतिन यांनी कधीही जाहीरपणे कबूल केलं नाही की, त्यांना किती मुले आहेत. परंतु पुतिन आणि त्यांच्या पत्नी ल्युडमिला ओचेरेत्नाया यांना झालेल्या मुली प्रसिद्ध आहेत. पुतिन यांच्या दोन्ही मुली, उद्योगपती मारिया वोरोंत्सोवा आणि कॅटरिना तिखोनोवा या सेलिब्रिटी म्हणून ओळखल्या जातात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget