![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Lahore Bomb Blast : पाकिस्तानातील लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, 20 जखमी
Lahore Bomb Blast :पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या एका बॉम्ब स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
![Lahore Bomb Blast : पाकिस्तानातील लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, 20 जखमी Many death and several injured in a blast at Lahore's Anarkali Bazaar area: Pakistan media Lahore Bomb Blast : पाकिस्तानातील लाहोरमध्ये बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, 20 जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/cf202ffd9e6297ca781bac6749b91ae4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lahore Bomb Blast :पाकिस्तानातील लाहोरमध्ये झालेल्या एका बॉम्ब स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. लाहोरच्या अनारकली (Anarkali) परिसरात हा स्फोट झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत झालेल्या स्फोटमध्ये 20 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात ( Mayo Hospital) दाखल करण्यात आहे
द डॉनने दिलेल्या वृत्तानुसार बॉम्ब स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहे. लाहोर पोलिस प्रवक्ता राणा आरिफ यांनी मृतांची आणि जखमींची माहिती दिली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार (Usman Buzdar) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना वैद्यकिय सेवा पुरवण्याचे देखील आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पाकिस्तानातील राजकीय पक्षातील नेत्यांनी घटनता निषेध केला आहे. पीएमएल- एनचे उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी अनारकली परिसरात झालेल्या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे. स्फोटातील जखमींसाठी प्रार्थना केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)