(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Bomb Blast : 1993 बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानकडून सुरक्षा, जंगी खातिरदारी
Mumbai Bomb Blast : पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने दाऊदच्या टोळीचा वापर करून मुंबईत दहशत निर्माण केला आणि त्या बदल्यात दाऊदला कराचीत आश्रय दिला, असा निशाणा भारताने पाकिस्तानवर साधला.
Mumbai BombBlast : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाकिस्तानने केवळ सरकारी संरक्षणच दिले नाही, तर त्यांना पंचतारांकित पाहुणचारही दिला जात होता, असे भारताने मंगळवारी सांगितले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता सांगत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक दहशतवाद विरोधी धोरणासंदर्भातील परिषदेत बोलून दाखवली.
'ग्लोबल काउंटर-टेररिझम कौन्सिल' द्वारे आयोजित 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन टेररिझम 2022' मध्ये संयुक्त राष्ट्र (UN) चे भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांच्यातील दुवा ओळखला पाहिजे. समस्या कठोरपणे हाताळली पाहिजे, असे म्हटले आहे. तिरुमूर्ती यांनी सांगितले की, ''1993च्या मुंबई बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगाराला पाकिस्तानने सरकारी संरक्षण दिले शिवाय त्याचा पंचतारांकित पाहुणचारही करण्यात आला''. 'डी-कंपनी' आणि त्याचा प्रमुख इब्राहिम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत तिरुमूर्ती यांनी हे वक्तव्य केले आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसल्याचे मानले जात आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये, सरकारने 88 प्रतिबंधित दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांवर व्यापक निर्बंध लादल्यानंतर पाकिस्तानने प्रथमच आपल्या भूमीवर दाऊदची उपस्थिती मान्य केली. 12 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनला.
तिरुमूर्ती यांनी पुढे सांगितले की, ''आयएसआयने (ISI) दाऊद आणि त्याच्या टोळीचा वापर केला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने दाऊदच्या टोळीचा वापर करून मुंबईत दहशत निर्माण केला आणि त्या बदल्यात दाऊदला कराचीत आश्रय दिला.'' 12 मार्च 1993 ही काळी तारीख मुंबई कधीच विसरू शकत नाही. एकापाठोपाठ एक 13 बॉम्बस्फोटांनी शहर हादरले. 257 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 750 लोक जखमी झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- PM Modi : 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून सुवर्ण भारतापर्यंत', पंतप्रधान मोदी आज करणार संबोधित
- Coronavirus Cases Today : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 17 हजारांहून अधिक नवे रुग्ण
- Omicron Variant : वाढत्या आजारांचा धोका! ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम
- Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 60 हजारांखाली, निफ्टीही 49 अंकांनी खाली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha