एक्स्प्लोर
Advertisement
दोन नवविवाहित जोडप्यांसह 20 जणांचा बस अपघातात मृत्यू
यूएसमध्ये मित्राच्या वाढदिवशी सरप्राईझ देण्यासाठी लिमोझिन बसने निघालेल्या 17 जणांसह पादचाऱ्यांवर काळाने घाला घातला.
न्यू यॉर्क : एकाच कुटुंबातील दोन नवविवाहित जोडपी, चार बहिणींसह 20 जणांचा भीषण बस अपघातात मृत्यू झाला. यूएसमध्ये मित्राच्या वाढदिवशी सरप्राईझ देण्यासाठी लिमोझिन बसने निघालेल्या 17 जणांसह पादचाऱ्यांवर काळाने घाला घातला.
यूएसमध्ये गेल्या दहा वर्षात झालेला हा सर्वात भीषण रस्ते अपघात मानला जात आहे. एमी स्टीनबर्ग या मित्राचा तिसावा वाढदिवस असल्यामुळे त्याला सरप्राईझ देण्यासाठी 17 जण लिमोझिन बसने निघाले होते.
न्यूयॉर्कमधील शॉहरी भागात वळणावर सुसाट जाताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस जवळच्या कार पार्किंगवर आदळली. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
बसमधील 17 प्रवासी, बसचालक आणि दोन पादचारी अशा 20 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील दोन नवविवाहित जोडपी, चार बहिणींचा, तर दुसऱ्या कुटुंबातील दोघा भावांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement