World : 'येथे' वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही संपवतात, विचित्र प्रथा आजही पाळली जाते; अत्यंत हिंसक आहे 'ही' जमात
Jarwa Tribe : बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे जगातील सर्वात वेगळ्या जमातींचं घर आहेत. यातीलच एक म्हणजे 'जारवा' जमात आहे.
Jarawa Tribe Tradition : बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे (Andaman Nicobar Islands) जगातील सर्वात वेगवेगळ्या आदिवासी जमातींचं घर (Andaman Islands Tribe) आहेत. यातीलच एक म्हणजे 'जारवा' जमात (Jarwa Tribe) आहे. येथील एक विचित्र प्रथेनुसार, वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही मारलं जातं. बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे जगातील सर्वात वेगळ्या जमातींचं घर आहेत. यातीलच एक म्हणजे 'जारवा' जमात आहे. जारवा जमात ही अंदमान आणि निकोबार बेटावरील 6 आदिवासी जमातींपैकी एक आहे. जरावा जमात ही नेग्रिटो जमातीची आहे. सध्या ही जमात मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमानच्या पश्चिम भागात राहते. ही जमात गेल्या 55 हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे पण आता या जमातीचे सुमारे 400 लोक उरले आहेत. जारवा आदिवासी सेंटिनेल बेटावर राहतात. सेंटिनेल बेटावर राहणाऱ्या जरावा जमातीला सेंटिनेलज या नावानं ओळखलं जातं.
बाहेरील जगाशी संबंध नाही
या आदिवासी जमातीचा बाहेरील जगाशी फारसा संबंध नाही. 1990 च्या दशकापर्यंत जारवा लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नव्हता. मात्र, पर्यटकांच्या येण्या-जाण्यासाठी ‘अंदमान ट्रंक रोड' रस्ता तयार झाला, त्यामुळे या जमातीचा बाहेरील जगाशी संपर्क येऊ लागला. पण याचा परिणाम जमातीच्या लोकांच्या जनजीवनावर होऊ लागला. त्यामुळं सरकारने नंतर हा रस्ता बंद करून येथे जाण्यास बंदी घातली.
गेल्या 50,000 हून अधिक वर्षांपासून अस्तित्वात
'जारवा' ही अंदमान-निकोबार बेटांवरील एक जमात आहे. अंदमानची जरावा जमात हिंद महासागरातील बेटांवर गेल्या 55,000 वर्षांपासून राहत आहे. जरावा जमातीच्या लोकांचे मूळ आफ्रिकन खंडातील असल्याचं मानलं जातं. जारवा जमात ही जगातील सर्वात जुनी जमात मानली जाते, जी अजूनही अश्मयुगाप्रमाणे आयुष्य जगत आहे.
वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही मारलं जातं
जारवा आदिवासी जमातीमध्ये पूर्वीपासूनची एक विचित्र प्रथा आजही पाळली जाते. येथे वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही जीवे मारलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, या जमातीमध्ये जर कोणती महिला विधवा झाली तर, तिच्या मुलाला ठार मारलं जातं, असं म्हटलं जातं. आणखी एका परंपरेनुसार, जारवा जमातीमध्ये मुलं गोरं जन्माला आल्यास त्यालाही ठार मारलं जातं. घरातील व्यक्ती त्या नवजात बालकाचा जीव घेतात, याचं कारण, फक्त असं की ते गोरं जन्माला आलं.
अत्यंत हिंसक आदिवासी जमात
जारवा जमातीचे लोक अत्यंत हिंसक असल्याचं सांगितलं जातं. धनुष्यबाण आणि भाल्याने शिकार करून जीवन जगत आहे. डुक्कर, कासव, मासे यांची शिकार करून पोट भरतात. हे लोक फळे, मूळ भाज्या आणि मध देखील खातात. जारवा जमात ही एकमेव जमात आहे, जिच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत सरकारही हस्तक्षेप करत नाही. एवढेच नाही तर उद्योगपती, सरकारी अधिकारी, पोलीस आणि लष्कर यांनाही या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. या बेटावरून परतणे जवळपास अशक्य असल्याचे, सांगितले जाते. त्यामुळे येथे जाण्यास मनाई आहे.
आदिवासी जमांतींच्या विविध प्रथा
अंदमान आणि निकोबार बेटांवरील जारवा जमातीसह इतरही अनेक आदिवासी जमांतींमध्ये विविध प्रथा पाळल्या जातात. दरम्यान, या आदिवासी जमातींसोबत जगाचा जास्त संपर्क नसल्यामुळे या परंपरा खऱ्या की खोट्या आणि त्या मागची वस्तूस्थिती काय, याबाबत कोणतीही अधिकृत आणि स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रथा कोणत्या आणि त्यामागचं नेमकं कारण काय आणि अधिकृत माहिती सांगणं कठीण आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :