Dani Tribe : काय सांगता..? 'येथे' कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर कापतात महिलेची बोटं, आजही पाळली जाते विचित्र प्रथा
Dani Tribe Indonesia : जगाच्या कोपऱ्यात एक अशी प्रथा पाळली जाते त्यानुसार, कुटुंबीतील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलेचं बोट कापलं जातं.
Weird Rituals Around the World : जगभरात विविध जाती, धर्माचे लोक पसरलेले आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात विविध प्रथा आणि परंपरा पाळल्या जातात. काही भागातील परंपरा फार विचित्र असतात आणि विशेष म्हणजे या विचित्र प्रथा आणि परंपरा आजतागत पाळल्या जातात. जगभरात प्राचीन काळापासून काही प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली महिलांना त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र प्रथेबद्दल सांगणार आहोत. जगाच्या कोपऱ्यात एक अशी प्रथा पाळली जाते, त्यानुसार कुटुंबीतील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलेला वेदना सहन कराव्या लागतात. त्या कुटुंबातील महिलेचं बोट कापलं जातं.
ही विचित्र आणि वेदनादायक परंपरा कुठे पाळली जाते आणि असं करण्यामागचं कारण काय आहे. यासोबतच या विचित्र परंपरेत कोणत्या प्रकारचे नियम पाळावे लागतात, हे सविस्तर जाणून घ्या...
कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं महिलेची बोटं छाटतात
इंडोनेशियामधील (Indonesia) दानी आदिवासी (Dani Tribe) जमातीमध्ये ही विचित्र आमि वेदनादायी प्रथा पाळली जाते. यानुसार, महिलेच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलेच्या हाताचं अर्ध बोट कापलं जातं. भयानक म्हणजे महिलेला या वेदनेचा सामना आयुष्यात फक्त एकदाच नाही तर, अनेकदा करावा लागतो. जर महिलेच्या हयातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येक वेळी महिलेच्या हाताचं अर्ध बोट कापलं जातं. जेव्हा-जेव्हा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होते, तेव्हा महिलेला या वेदनादायी प्रथेला सामोरं जावं लागतं.
आजही पाळली जाते विचित्र प्रथा
आपल्या कुटुंबातील जीवलग व्यक्ती गमावल्याने होणाऱ्या भावनिक वेदना असह्य असतात. पण इंडोनेशियातील एका जमातीमध्ये महिलांना एखादा जीवलग व्यक्ती गमावल्यावर भावनिक वेदनांसह शारीरिक वेदनाही दिल्या जातात. इंडोनेशियातील एका आदिवासी जमातीमध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्या कुटुंबातील महिलेचं बोट कापलं जातं. ही विचित्र प्रथा आजही कायम आहे.
काय आहे यामागचं कारण?
मीडिया रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या दुर्गम दानी जमातीमध्ये ही वेदनादायी प्रथा पाळण्यामागचं कारणही विचित्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबातील महिला सदस्याच्या हाताचं अर्ध बोट कापल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्यापासून संरक्षण होतं, असं सांगितलं जातं. येथे असं मानलं जातं की, महिलांचं बोट कापल्यामुळे मृत व्यक्तीची अस्वस्थ आत्मा शांत होते आणि कुटुंबातील इतरांना कोणतीही हानी पोहोचवत नाही. तसेच ही शोक व्यक्त करण्याची एक पद्धत आहे.