एक्स्प्लोर

इस्राईलमधील निवडणुकांमध्ये पंतप्रधान नेतन्याहूंकडून प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर

भारतातील निवडणुकांप्रमाणे इस्राईलमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळत आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर करत आहेत.

नवी दिल्ली : इस्राईलममध्ये पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भारतातील निवडणुकांप्रमाणे इस्राईलमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतील खास आकर्षण म्हणजे नेतन्याहू प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर करत आहेत.

नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांचा फोटो वापरुन परराष्ट्र धोरणाचं यश दाखवण्याचा प्रयत्न नेतन्याहू करत आहेत. नेतन्याहू यांनी जगभरातील नेत्यांना भेटल्याचा व्हिडीओही जारी केला आहे. या व्हिडीओत नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांना भेटत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील हा व्हिडीओ आहे.

पंतप्रधान नेतन्याहू यांच्या पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेतन्याहू नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दिसत आहेत.

इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत नेतन्याहू यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकलं नाही आणि इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे.

नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून भारताची इस्राईलशी जवळीक वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेन्जामिन नेतन्याहू यांची अनेकदा भेट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी इस्राईलचा आणि नेतन्याहू यांनी भारताचा दौरा केला आहे. तसेच इस्राईलमधील निवडणुकांआधी नेतन्याहू पुन्हा एकदा भारताचा दौरा करु शकतात.

भारताने काही महिन्यांपूर्वी आपली भूमिका बदलत संयुक्त राष्ट्रात आर्थिक आणि सामाजिक परिषदेत इस्राईलच्या एका प्रस्तावाला समर्थनही दिलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar  on Anil Deshmukh :  अनिल देशमुखांच्या कारवर हल्ला; शरद पवार काय म्हणाले ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  8 AM :  19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSalil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Embed widget