जिथं हिजबुल्लाहच्या नव्या प्रमुखाला कंठस्नान, थेट तिथून रिपोर्टिंग; ABP वर इराण-इस्रायल युद्धाची A टू Z माहिती!
हिजबुल्लाहला संपवण्यासाठी इस्रायलने चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. इस्रायलकडून लेबनॉनवर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. एबीपी न्यूज थेट या युद्धभूमीवर पोहोचले आहे.
Iran Israel Conflict: आशिया खंडातील आखाती प्रदेशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. हिजबुल्लाह (Hezbollah) या संघटनेला समूळ नष्ट करण्याचा इस्रायलने प्रण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्रायलने आपले सैन्य लेबनॉनमध्ये घुसवले आहे. तर दुसरीकडे लेबनॉनच्या संरक्षणासाठी इराण देश पुढे आला आहे. इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) इस्त्रायलवर थेट 180 क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर आता आखाती प्रदेशातील स्थिती जास्तच चिंताजनक झाली आहे. इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ला आणखी तीव्र करण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एबीपी न्यूज थेट युद्धभूमीवरून पोहोचले आहे. लेबनॉनमध्ये घडत असलेल्या घटनांचे इत्यंभूत वृत्त जगविंदर पटियाल देत आहेत.
अनेक इमारती जमीनदोस्त, सगळा परिसर बेचिराख
पटियाल सध्या ग्राऊंड झिरोवरून रिपोर्टिंग करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी बेरूत या भागात इस्रायलने हल्ले केले आहेत. याच भागात सैफीद्दीन याला कंठस्नान घालण्यात आलंय. या हल्ल्यानंतर साधारण 15-20 मिनिटांनंतरदेखील या भागात पोलीस किंवा वैद्यकीय मदत पोहोचलेली नव्हती. इस्रायलकडून सर्वप्रथम हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य केलं जातंय. इस्रायलने दक्षिण बेरुतमधील ज्या भागाला लक्ष्य केलंय त्या भागात लोकवस्ती आहे. मात्र इस्रायलकडून केले जाणारे हल्ले लक्षात घेऊन या भागातील सामान्यांना हलवण्यात आले होते.
पाहा थेट युद्धभूमीवरचं रिपोर्टिंग
एबीपी न्यूजचे जगविंदर पटियाल हे थेट लेबनॉनमध्ये पोहोचले आहेत. ते सध्या बेरूतमध्ये आहेत. याच भागात इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. या ठिकाणी असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना इस्रायलकडून लक्ष्य केलं जातंय. याच भागात हमासचा हसन नरूल्लाह याचा भाऊ हाशेम सैफीद्दीन याला मारल्याचे म्हटले जात आहे. याच युद्धभूमीवरून 27 सप्टेंबरपासून (शुक्रवार) जगविंदर पटियाल वार्तांकन करत आहेत.
दक्षिण बेरुतमध्य सर्वाधिक हल्ले
पटियाल यांनी सांगितलेल्या माहितीनुसार इस्रायलकडून सध्या दक्षिण बेरुतला लक्ष्य केलं जातंय. हा भाग हिजबुल्लाहचा गड मानला जोत. इस्रायलने या भागात आतापर्यंत 30-40 क्षेपणास्त्र डागलेले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत हिजबुल्लाहचे अनेक समर्थक मारले गेले आहेत. इस्रायलने सर्वांत अगोदर बेरुत शहरावर क्षेपणआस्त्र डागले होते. त्यानंतर आता इस्रायलने आपली रणनीती बदलली असून ड्रोनच्या मदतीने हिजुबल्लाहच्या तळांना शोधलं जातंय. त्यानंतर या तळांवर हल्ले केले जात आहेत.
हेही वाचा :
Israeli Lebanese conflict : इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला, युद्धभूमीतून ग्राऊंड रिपोर्ट