एक्स्प्लोर

Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत भारतातील इस्रायल दूतावासात कोणताही कट होऊ नये म्हणून दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Israel vows Iran response : राजधानी नवी दिल्लीतील दिल्लीतील इस्रायली दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अब्दुल कलाम रोड बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वाहनांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीडियालाही इस्रायली दूतावासात जाऊन व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली जात नाही. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत भारतातील इस्रायल दूतावासात कोणताही कट होऊ नये म्हणून दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

इस्रायल दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली  

या भागात कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांनी इस्रायल दूतावासाची सुरक्षा व्यवस्था वाढवली असून दूतावासाकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ गेल्या काही वर्षांत दोनदा संशयास्पद आयईडी स्फोट झाले आहेत. मध्यपूर्वेतील युद्धाची परिस्थिती वाढत असताना भारताने इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक सूचना जारी करून भारतीय लोकांना इराणमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला होता.

डेन्मार्कमधील इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट

इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणची प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणने म्हटले आहे की, "आम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. आम्ही निरपराधांवर हल्ला केला नाही. आम्ही फक्त लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला." डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला. डॅनिश पोलिसांनी सांगितले की ते प्रकरणांचा तपास करत आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे कोपनहेगन पोलिसांनी सांगितले.

इस्त्रायली सैनिकांची हिजबुल्लाहच्या सैनिकांशी चकमक 

दुसरीकडे, लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागात इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरू असलेल्या भू-युद्धात बुधवारी (2 ऑक्टोबर) इस्त्रायली सैन्य मारून अल-रस गावाच्या 2 किमीच्या आत पोहोचले आहेत. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैनिकांची येथे हिजबुल्लाहच्या सैनिकांशी चकमकही झाली होती. इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की हा हल्ला मोसाद मुख्यालय, नेवाटीम एअर बेस आणि टेल नोफ एअर बेसला लक्ष्य करण्यात आला. इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केली. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना इस्रायलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला नाही, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

समोरासमोर झालेल्या या लढाईत आतापर्यंत 2 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण जखमी झाले आहेत. इस्रायलचा पेजर हल्ला, वॉकी-टॉकी हल्ला आणि हवाई हल्ल्यानंतर आता हिजबुल्लाहच्या विरोधात जमीनीवरील कारवाई आहे.इस्रायल लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, गाझामध्ये हमास, इराण आणि येमेनमध्ये हुथीशी लढत आहे. मंगळवारी रात्री इराणने इस्रायलवर 180 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीस 3.0 ची सुरुवात, पुन्हा आल्यानंतरची आव्हानं काय?Special Report Eknath Shinde :आमदारांचा वाढता दबाव, अखेर एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथSpecial Report Mahayuti Oath Ceremony : अंबानी, अदानी, सुपरस्टार, नव्या सरकारचा ग्रँड शपथविधीZero Hour Mahayuti Oath Ceremony : महायुतीच्या विजयापासून शपथविधीपर्यंत, झिरो अवरमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget