(Source: ECI/ABP News/ABP Majha)
International Human Solidarity Day : आज आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन; का साजरा करतात हा दिवस
International Human Solidarity Day :दरवर्षी 20 डिसेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
importance of International Human Solidarity Day : मानवी समाजात एकतेचं महत्व वेळोवेळी दिसून येतं. संकटात सापडलेल्या जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील व्यक्तिच्या मदतीला लोकं धावून जातात. यामागे प्रेरणा असते एकतेची. यातूनच प्रेरणा घेऊन दरवर्षी 20 डिसेंबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. विविधतेतील एकतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी 22 डिसेंबर 2005 रोजी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. लोकांना एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या समाजात एकता आणि संबंधांची मानसिक भावना निर्माण करणार्या उद्देशांची जाणीव म्हणून एकता दिवस साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याबाबतचं कारण सांगताना युनायटेड नेशन्सनं म्हटलं होतं की, संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीमुळे शांतता, मानवी हक्क आणि सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जगातील लोक आणि राष्ट्रे एकत्र आकर्षित झाली. संघटनेची स्थापना तिच्या सदस्यांमधील ऐक्य आणि सुसंवादाच्या मूलभूत तत्त्वावर करण्यात आली. जी सामूहिक सुरक्षिततेच्या संकल्पनेतून व्यक्त केली गेली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्वांची एकता अत्यंत महत्वाची आहे.
आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस हा शाश्वत विकास अजेंडावर आधारित आहे, जो लोकांना गरीबी, भूक आणि आजार यासारख्या गोष्टीतून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रीत करतो. 'मिलेनियम डिक्लेरेशन'च्या अनुषंगाने, 21 व्या शतकातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे एक मूलभूत मूल्य म्हणून एकता ओळखली जाते.
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवसाचे महत्त्व-
विविधतेत एकता दाखवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
विविध सरकारांना आंतरराष्ट्रीय करारांची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
लोकांमध्ये एकतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
शाश्वत विकासासाठी लोकांना, सरकारांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
गरीबी निर्मूलनासाठी नवीन मार्ग शोधणे हा दिवस साजरा केला जातो.
लोकांना गरिबी, भूक, रोग यातून बाहेर काढण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha