Currency : मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशाच्या नोटेवर गणेशाचा फोटो, इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला?
Indonesia Currency : इंडोनेशिया आणि श्री गणेशाचा संबंध काय आणि इंडोनेशियाच्या नोटांवर श्री गणेशाचा फोटो का आहे, या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पडली असतील. तर याची सविस्तर माहिती करुन घ्या.
Lord Ganesh Photo on Indonesia Currency : जागतिक पातळीवर भारतीय चलन (Indian Currency) घसरताना दिसत आहे. या संकटातून भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नोटांवर भारतीय देवता गणेश (Ganesha) आणि लक्ष्मीचा (Laxmi) फोटो वापरण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. केजरीवाल यांनी इंडोनेशिया देशाच्या चलनी नोटांचा संदर्भ देत ही मागणी केली आहे. इंडोनेशियाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही नोटांवर देवांचे फोटो वापरावे, म्हणजे चलनाची घसरण थांबून अर्थव्यवस्था बळकट होईल, असं केजरीवाल यांनी म्हटलं. पण इंडोनेशिया आणि श्रीगणेशाचा संबंध काय आणि इंडोनेशियाच्या नोटांवर श्री गणेशाचा फोटो का आहे, या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पडली असतील तर याची सविस्तर माहिती करुन घ्या.
मुस्लिम बहुसंख्य इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेश
इंडोनेशिया हा आशिया खंडातील एक देश आहे. इंडोनेशिया मुस्लिम बहुसंख्या देश आहे. या देशात सुमारे 80 टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मीय आहे. पण तरीही या देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो आहे. आता मुस्लिम देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला ते जाणून घ्या.
पुरातन काळात इंडोनेशियावर हिंदू शासकांचं राज्य होतं. त्यामुळे येथील संस्कृतीवर हिंदू संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो. नोटेवर गणपती कसे आले, याबाबत एक कथा सांगितली जाते ती अशी की, 90 च्या दशकात जगातील सर्वच देश आर्थिक संकटात सापडले होते. यावेळी इंडोनेशियालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. तेव्हाच्या सरकारला असं सुचवण्यात आलं की, जर चलनी नोटेवर श्री गणेशाचा फोटो लावला तर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. त्यानंतर सरकारने चलनी नोटेवर श्रीगणेशाचा फोटा छापण्यात आला.
श्रीगणेशाचा फोटो असलेली नोट आता चलनात नाही
इंडोनेशियातील चलनाला रुपयाह (Rupiah) (इंडोनेशियन रुपयाह = 0.0053 भारतीय रुपये) म्हणतात. आर्थिक संकटात सापडलेल्या इंडोनेशियामध्ये 1965 साली श्रीगणेशाचा फोटो असलेली 20,000 रुपयाहची नोट (20000 रुपयाह = सुमारे 105 रुपये) छापण्यात आली होती. त्यानंतर येथील अर्थव्यवव्स्था सुधारली असं म्हटलं जातं. पण आता ही नोट चलनात नाही. 31 डिसेंबर 2018 साली या नोटेवर बंदी आणण्यात आली.
( ही नोट 1965 पासून 2018 पर्यंत चलनात होती )
इंडोशियाच्या 20,000 रुपयाहच्या नोटेवर एका बाजूला श्री गणेशाचा फोटो आहे. त्याच्या शेजारी स्वातंत्र्य सेनानी हजर देवंतारा यांचा फोटो आहे. इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये देवंतारा यांचा मोठा वाटा आहे. शिवाय नोटेवर मागच्या बाजूला वर्ग खोली आहे. शिवाय एका कोपऱ्यात गरूड पक्षी आहे. गरुड हे इंडोशियाचं राष्ट्रीय चिन्ह आहे, जसं भारताचं चिन्ह सिंह आहे. इंडोनेशियामध्ये गरुड पुराणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गरुड पक्षाची राष्ट्रीय चिन्ह म्हणून निवड करण्यात आली.
एक रुपयाह (इंडोनेशियन चलन) = 189.63 रुपये (भारतीय चलन)
इंडोनेशिया देशावर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव
इंडोनेशियामध्ये हिंदू संस्कृतीचा पगडा आहे. कारण येथील मूळ संस्कृती हिंदू होती. इंडोनेशियामध्ये आधी चोला साम्राज्य होतं. चोला राजांनी अनेक प्रदेशांमध्ये सत्ता काबीज केली होती. यामुळेच इंडोनेशियाचं मूळ हिंदू संस्कृती आहे. त्यानंतर येथे मुघलांची सत्ता होती. त्यानंतर येथे डच साम्राज्य होतं. यानंतर इंडोनेशियामध्ये व्यापारासाठी अरब व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यानंतर ते अरब व्यापारी इंडोनेशियात स्थायिक झाले अशा प्रकारे इंडोनेशियामध्ये मुस्लिमांची संख्या वाढली. पण येथील नागरिकांची हिंदी संस्कृतीशी आपली नाळ तोडलेली नाही. येथील हिंदू - मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात. येथील अनेक मुस्लिम बांधवांची नावे ही हिंदू धर्मीय आहेत.
व्यापारामुळे इंडोनेशियात मुस्लिम धर्मीय वाढले
दुसऱ्या विश्व युद्धानंतर इंडोनेशिया एक स्वतंत्र देश म्हणून नावारुपाला आला. इंडोनेशिया देशावर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. 80 टक्के मुस्लिम बांधव असलेल्या या देशात जागोजागी गणपती आणि बौद्ध विहारे आहेत. इंडोनेशिया या हिंदू आणि बौद्ध धर्मीयांचा मिळून बनलेला देश आहे. यानंतर इंडोनेशियामध्ये व्यापारासाठी अरब व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यानंतर ते अरब व्यापारी इंडोनेशियात स्थायिक झाले अशा प्रकारे इंडोनेशियामध्ये मुस्लिमांची संख्या वाढली.
रामायण आणि महाभारताचं महत्त्व
इंडोनेशिया देशात महाभारत आणि रामायण यांना पवित्र ग्रंथाचं स्थान आहे. इंडोनेशियातील लोक महाभारत आणि रामायण या ग्रंथांवर खूप विश्वास आहे. इंडोनेशियातील पर्यटनही यांच्या भोवतीच फिरतं. इंडोनेशियामध्ये अनेक मोठी मंदिरं आणि बौद्धविहारं आहेत. येथील स्थापत्यकलेमध्ये हिंदू, मुघल आणि डच यांचा प्रभाव दिसून येतो.
(टीप - एबीपी माझा या बातमीतून कोणताही दावा करत नाही. हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. )