PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहेत वॉशिंगटनमध्ये, आज उपराष्ट्रपती कमला हैरिससोबत होणार चर्चा
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंगटनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नवी दिल्लीमधून अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते.
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवशीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. सध्या ते वॉशिंगटनमध्ये पोहोचलेले आहेत. काल ते अमेरिकेला जाण्यासाठी दिल्लीहून निघाले होते. आणि आता ते वॉशिंगटनमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान आता पेंसिलवेनिया एवेन्यू येथील विलार्ड इंटरकॉंटिनेंटल हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि तिथेच राहणार आहेत.
आज 23 डिसेंबर रोजीअमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 9:40 बाजता ( भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:15 वाजता) पंतप्रधान मोदी त्याच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या सीईओंसोबत चर्चा करणार आहेत. तसेच पंतप्रधान आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हैरिसनादेखील भेटणार आहेत.आज होणाऱ्याबैठकीतक्वालकॉमचे अध्यक्ष आणि सीईओ, अॅडॉबचे चेअरमॅन, पहिल्या सोलरचे सीईओ, जनरल अॅटोमिक्सचे चेअरमॅन आणि सीईओ तसेच ब्लॅकस्टोनचे संस्थापक सहभागी असतील.
अमेरिकेत जाण्याआधी पंतप्रधानांनी त्यांच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मी अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहे. तसेच विचारांचे आदानप्रदानदेखील करणार आहेत. मी दोन्ही देशांसाठी विशेष असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान याक्षेत्रावरदेखील प्रकाश टाकणार आहे. त्यासाठी उपराष्ट्रपती कमला हैरिस ला भेटण्यासाठी उत्यूक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत वाढता कोविडचा प्रादुर्भाव, अतंकवादी संघटना, जलवायू परिवर्तन अशा महत्तवाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. हा दौरा अशा विविध जागतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
