एक्स्प्लोर
Advertisement
इम्रान खान यांची तिसरी बायकोही भांडून माहेरी!
पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या तिसऱ्या बायकोनेही त्याच्यापासून फारकत घेतल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि 'तेहरीक ए इन्साफ' या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या नशिबात संसारसुखच नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इम्रान यांच्या तिसऱ्या बायकोनेही त्यांच्यापासून फारकत घेतल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
65 वर्षीय इम्रान यांच्या संसारातील शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत. इम्रान खानची तिसरी पत्नी बुशरा मनेकनेही त्यांना गुडबाय करत माहेरचा रस्ता धरला आहे. बुशरा यांच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचं घरात राहणं इम्रान यांना पटत नव्हतं. त्यामुळे दोघं जण वेगळे झाल्याची माहिती आहे.
बुशराच्या माहेरची कोणतीही व्यक्ती फार काळ घरात राहणार नाही, अशा प्रकारचा तह दोघांमध्ये लग्नापूर्वीच झाला होता. मात्र बुशराचं पोरगं ठाण मांडून बसल्यामुळे इम्रान यांची मुस्कटदाबी झाली. अखेर दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या करण्याचं ठरवलं.
इम्रान खान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत, आध्यात्मिक गुरुशी सूत जुळलं!
पाळीव कुत्र्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाल्याचं म्हटलं जात आहे. पत्नी बुशराच्या सांगण्यावरुन इम्रान खानने त्यांचा पाळीव कुत्रा 'शेरु'ला घराबाहेर काढलं होतं. हे कुत्रे धार्मिक कार्यांमध्ये अडथळा ठरत असल्याचं बुशरा यांचं म्हणणं होतं. मात्र कुत्रा परतल्याने बुशरा नाखुश होत्या.
त्यातच इम्रान खान यांच्या घरात रिनोव्हेशनचं काम काढल्यानंतर नणंदांची ढवळाढवळही बुशराला खुपायला लागली आणि वादाची ठिणगी पडली.
इम्रान खान यांचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथसोबत 1995 साली झालं होतं. जेमिमासोबत 9 वर्षांच्या संसारानंतर 2004 मध्ये इम्रान यांनी तिला तलाक दिला. 2015 मध्ये टीव्ही प्रेझेंटर रेहम खान हिच्याशी इम्रान खान विवाहबद्ध झाले. मात्र हे नातं केवळ 10 महिने टिकलं.
40 वर्षीय बुशरा मनेक या आध्यात्मिक परंपरेतील आहेत. इम्रान खान बुशरा यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होते. फेब्रुवारी 2018 मध्ये इम्रान तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement