खुशखबर! युएस H-1B व्हिसा असणाऱ्या नागरिकांना मिळणार 'हा' फायदा, कॅनडा सरकारचं मोठं पाऊल
H-1B Holders : कॅनडाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. तुमच्याकडे युएस H-1B व्हिसा असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंबासह खास योजनेचा लाभ घेऊ शकता.
Canada Work-Permit Stream for H-1B Visa : H-1 B व्हिसा (H-1B Visa Holders) असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेचा शेजारी देश कॅनडा युएस H-1B व्हिसाधारकांसाठी मार्ग खुला करणार आहे. H-1B व्हिसा धारकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील फायदा होणार असल्याचं कॅनडाच्या इमिग्रेशन, निर्वासित आणि नागरिकत्व मंत्रालयाने जाहीर केलं आहे. कॅनडा आता H-1B धारकांसाठी 'ओपन वर्क परमिट स्ट्रीम' आणणार आहे. यामध्ये H-1B व्हिसा धारकाच्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षण आणि वर्क परमिट मिळणं सोपं होणार आहे.
कॅनडाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर
अलिकडे भारतीय तरुणांचा अमेरिका-कॅनडासारख्या मोठ्या देशात जाण्याचा कल वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान, यूएस सरकारने (US Govt) H-1B व्हिसा नियम सुलभ करण्याचं जाहीर केलं होतं. आता H-1B व्हिसाचं नूतनीकरण (H-1B Visa Renewal) अमेरिकेतच (USA) केलं जाईल, यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आता कॅनडा सरकारनेही H-1B व्हिसाधारकांसाठी एक मोठं पाऊल उचलले आहे, याचा फायदा व्हिसाधारकांच्या कुटुंबांनाही होणार आहे.
H-1B व्हिसा धारकांसाठी कॅनडाची खास योजना
कॅनडाचे इमिग्रेशन (Canada Minister of Immigration) मंत्री सीन फ्रेझर (Sean Fraser) यांनी घोषणा केली की, सरकार 10,000 यूएस H-1B व्हिसा धारकांना कॅनडामध्ये येऊन काम करण्याची परवानगी देण्यासाठी ओपन वर्क-परमिट स्ट्रीम तयार करणार आहे. कॅनडाच्या इमिग्रेशन आणि नागरिकत्व मंत्रालयानं म्हटलं आहे की, नव्या नियमामुळे H-1B व्हिसा धारकांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी शिक्षण आणि वर्क परमिट मिळेल.
H-1B व्हिसाधारकांनाही कॅनडामध्ये प्राधान्य
कॅनडाच्या मंत्रालयानं म्हटलं आहे की, कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या कंपन्यांद्वारे भारतासारख्या देशातील हजारो कामगार उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात आणि यूएसमध्ये काम करणारे लोक अनेकदा H-1B व्हिसावर असतात. कॅनडा सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता आमच्या अर्जदारांना तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ओपन वर्क परमिट मिळेल. 16 जुलै, 2023 पर्यंत, यूएसमधील विशेष व्यवसाय व्हिसा धारक आणि त्यांच्या सोबतचे कुटुंबीय कॅनडामध्ये स्थलांतरित होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. H-1B व्हिसाधारक कॅनडामध्ये कोणत्याही क्षेत्रात आणि कुठेही काम करु शकतील. व्हिसाधारकाचे पती/पत्नी आणि नातेवाईक देखील आवश्यकतेनुसार काम किंवा शिक्षण परवाना असलेल्या तात्पुरत्या निवासी व्हिसासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
कॅनडाचे सरकारचं खास इमिग्रेशन स्ट्रीम
कॅनडाचे मंत्री सीन फ्रेझर यांनी सांगितलं की, या वर्षाच्या अखेरीस कॅनडा सरकार जगातील काही प्रतिभावान लोकांना कॅनडामध्ये टेक कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येण्यासाठी इमिग्रेशन स्ट्रीम विकसित करेल. मात्र, अशा योजनेसाठी कोण पात्र असेल किंवा किती जणांना प्रवेश दिला जाईल, हे मंत्र्यांनी स्पष्ट केले नाही.