Pakistan : महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, आमदार म्हणते, 'ती मी नव्हेच'
Viral Video : पाकिस्तानमध्ये एका महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ही आपण नसल्याचा दावा या महिला आमदाराने केला आहे.
![Pakistan : महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, आमदार म्हणते, 'ती मी नव्हेच' Obscene pornographic video of Pakistani woman Muslim League Nawaz MLA goes viral Pakistan : महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, आमदार म्हणते, 'ती मी नव्हेच'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/b71e366761e55219318ed869a7146ebb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लाहोर : पाकिस्तानमध्ये महिला आमदाराचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यामुळे त्या देशात एकच खळबळ उडाली आहे. सानिया आशिक असं या महिला आमदाराचं नाव आहे. त्या व्हिडीओमध्ये आपण नसून आपल्यासारखी दिसणारी दुसरी महिला आहे असा दावा तिने केला आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सानिया आशिक या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाच्या सदस्या आहेत.
पाकिस्तानच्या पंजाबमधील तक्षशिला या विधानसभेतून निवडून आलेल्या सानिया आशिक यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर सानिया आशिक यांनी 26 ऑक्टोबरला पाकिस्तानातील सायबर तपास यंत्रणेकडे तक्रार केली. त्यांनी टिकटॉक आणि इतर सोशल मीडियाविरोधातही तक्रार दाखल केली आहे.
ती मी नव्हेच, सानिया आशिकांचा दावा
आमदार सानिया आशिक यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, व्हायरल होणाऱ्या अश्लील व्हिडीओमध्ये असलेली महिला ही आपल्यासारखी दिसणारी आहे, ती आपण नाही. सोशल मीडियावर दावा केला जातोय की ती महिला आपण आहे. त्यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे. सानिया आशिक यांनी याची तक्रार इमरान खान सरकारकडेही केली आहे.
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की त्या व्हिडीओमधील महिला ही आमदार सानिया आशिक याच आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Viral Video : 'ती'चा खांदा बलाढ्य..., बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला खांद्यावरुन नेणाऱ्या इन्स्पेक्टर राजेश्वरींवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- Viral News : या चित्रात मांजर शोधून दाखवा...ट्विटरवर लोक हैराण झालेत पण...
- नंदीबैलाने स्वीकारले 'फोन पे'ने पैसे, डिजिटल इंडियाचा अजून काय पुरावा हवा? आनंद महिंद्रांनी केला व्हिडीओ शेअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)