Viral News : या चित्रात मांजर शोधून दाखवा...ट्विटरवर लोक हैराण झालेत पण...
Viral Picture on Twitter: ट्विटरवर एका काळ्या रंगाच्या दरवाज्याचा फोटो शेअर करण्यात आला असून त्यात मांजर शोधण्याचं आव्हान देण्यात आलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर लोक काय चॅलेन्ज देतील काही सांगता येत नाही. महत्वाचं म्हणजे असं चॅलेन्ज स्वीकारणाऱ्यांचा भरणाच सोशल मीडियावर पडून असतो. आता हेच बघा ना, Buitengebieden ने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यामध्ये लपलेल्या मांजराचा शोध घेण्याचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सोपं जरी वाटत असलं तरी भलेभले त्यापुढे गारद झालेत पण त्यातलं मांजर काही सापडत नाही.
Buitengebieden ने ट्विटरवर एक काळ्या रंगाचा दरवाजा असलेला फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये एक मांजर असून ते शोधा असं आव्हान दिलं आहे. तसं पाहता अनेकांना हा टास्क अतिशय साधा वाटतोय.
There’s a cat in this picture.. pic.twitter.com/pc8tMgUdLY
— Buitengebieden (@buitengebieden_) November 3, 2021
या दरवाज्याला काचेची तावदान असल्याचं दिसतंय. कदाचित त्यामध्ये हे मांजर लपल्याचं अनेकांनी म्हटलंय. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटंच हे चॅलेन्ज स्वीकारलंय तर चुकीचं आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास सात हजार लाईक्स आल्या आहेत तर साडेतीनशेच्या जवळपास कमेन्ट आल्या आहेत.
Here...https://t.co/7xKQomDPuL
— Arie Aduen (@ArieAduen) November 4, 2021
In here... pic.twitter.com/WAfBza33MW
या ट्वीटमध्ये सर्वात मजेशीर काय असेल तर लोकांच्या कमेन्ट्स. ज्या लोकांना या चित्रात मांजर सापडलं नाही त्यांनी इतर ठिकाणच्या मांजरांचा फोटो टाकला आहे.
Great camouflage.
— Ellen Karnes (@KarnesEllen) November 3, 2021
Now Gilbert the Goober King is still working on his camouflage skills. 😆 pic.twitter.com/94xanyL7Ru
तुम्हीही हे चॅलेन्ज स्वीकारा आणि बघा... या चित्रात मांजर सापडतंय का ते.
महत्वाच्या बातम्या :
- काय सांगताय? 24 वर्षाच्या महिलेने दिला एकाच वर्षात 21 मुलांना जन्म, शंभरचा आकडा गाठण्याचा निर्धार
- बँकेत मास्क घालायची विनंती केल्याने 5.8 कोटी रुपयांच्या नोटा काढल्या अन् बँकवाल्यांना मोजायला लावल्या
- Viral News : महिलेच्या अंतर्वस्त्रामध्ये लपून पालीने केला तब्बल चार हजार मैलांचा प्रवास, इंग्लंडमधील विचित्र घटना