Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर
Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.
Japan Former PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा आवाज ऐकू आल्याचं म्हटलंय. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसलं. त्यामुळे गोळीबारातच शिंजो आबे जखमी झाले असावेत असं वृत्त समोर येत आहे.
भाषणादरम्यान गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
जपानच्या नारा शहरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या वृत्तसंस्था एनएचकेनुसार शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुसऱ्या एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पश्चिम जपानमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होतं. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Former Japanese Prime Minister Shinzo Abe collapsed during a speech in the city of Nara, in western Japan. Initial reports say he may have been injured. An NHK reporter on site heard something that sounded like a gunshot, and saw Abe bleeding: Japan's NHK WORLD News
— ANI (@ANI) July 8, 2022
दोन हल्लोखोर अटकेत
जपानची वृत्तसंस्था द जपान टाईम्सच्या वृत्तानुसार, गोळीबारात शिंजो आबे जखमी झाले आहेत. आबे यांनी दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. त्यांना छातीत एक गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
आजारपणामुळे दिला होता पंतप्रधान पदाचा राजीनामा
शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
Deeply distressed by the attack on my dear friend Abe Shinzo. Our thoughts and prayers are with him, his family, and the people of Japan.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Boris Johnson Resigns: अखेर बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा; नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर
- Russia Ukraine War : रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर ठार, कोण होती थालिता डो?
- Mohammed Zubair : पत्रकार मोहम्मद जुबेरवरून जर्मनीने भारतावर साधला निशाणा, लोकशाही मुल्यांबाबत फटकारले