(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर ठार, कोण होती थालिता डो?
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार झाली आहे. थालिता ही एक मॉडेल होती. शिवाय ती एक प्रशिक्षित शार्प शूटर होती.
Russia Ukraine War : रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो ठार झाली आहे. थालिता डो ही ब्राझीलची मॉडेल असून ती युक्रेनच्या सैन्यात सहभागी झाली होती. थालिता ही एक प्रशिक्षित शार्प शूटर होती. रशियाच्या हवाई हल्ल्यात ती ठार झाली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संर्घष आता शिगेला पोहोचला आहे. युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु, युद्धातून माघार घेण्यास कोणताच देश तयार नाही. या युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक सामान्य लोकांपासून ते सैनिकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता युक्रेनची शार्प शूटर थालिता डो हिला आपला जीव गमवावा लागला आहे.
30 जून रोजी रशियाने युक्रेनच्या खार्किवमध्ये रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे बंकरला आग लागली. त्यामुळे थालिता डो हिचा मृत्यू गुदमरून मृत्यू झाला. थालिता हिचा साथीदार डग्लस बुर्गियो याला देखील या रॉकेट हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. थालिताला बंकरमधून बाहेर काढण्यासाठी जात असताना बुर्गिओचा मृत्यू झाला.
कोण होती थालिता डो?
थालिता डो ही ब्राझीलची रहिवासी होती. तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केले. त्यानंतर तिने लॉचे शिक्षण घेतले होते. ISIS विरुद्ध लढण्यासाठी ती कुर्दीश सैन्यात सामील झाली होती. थालिता एक ट्रेंड शार्प शूटर होती. मृत्यूच्या तीन आठवडे आधीच ती लढाईसाठी युक्रेनला पोहोचली होती. युक्रेनध्ये पोहोचल्यानंतर तिला खार्किवला पाठवण्यात आले होते. परंतु, रशियाच्या रॉकेट हल्ल्यात तिला आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, रशियाकडून युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्यात येत आहेत. त्यामध्ये रशियामधील महत्वाच्या शहरांना लक्ष्य केले जात आहे. खार्किव देखील युक्रेनधील दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे शहर आहे. त्यामुळे रशियाकडून खार्किवला लक्ष्य केले जात आहे. या शहरावर रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत. हे शहर रशियाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे खार्किव ताब्यात घेण्यासाठी रशियाकडून प्रयत्न सुरू आहेत.