एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर : सूत्र
नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दाऊदला कराचीतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याबरोबरच दाऊदला 20 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला आहे.
दाऊद इब्राहिम 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. यात शेकडो निरपराधांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटानंतर म्हणजे आजपासून सुमारे 23 वर्षांपूर्वी दाऊद पाकिस्तानात पळाला. मात्र, दाऊद आपल्या देशात नसल्याचाच दावा कायमच पाकिस्तानने केला आहे.
एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा असलेल्या दाऊदच्या गुन्हेगारी जीवनाची सुरुवात मुंबईतून झाली. सुरुवातीला तो डॉन करीम लालाच्या गँगमध्ये होता. मात्र, 1980 च्या दशकात त्याची दहशत वाढली आणि बॉलिवूडमधील कलाकारांना धमकावण्यापासून जुगारापर्यंत सर्व अवैध धंद्यात त्याने वर्चस्व निर्माण केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement