एक्स्प्लोर
Advertisement
Corona World Update | जगभरात 31 लाख 36 हजार कोरोनाबाधित, मृत्यूंचा आकडा 2 लाख 17 हजारांवर
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 31 लाखांच्या वर पोहोचला आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 17 हजारांच्या वर पोहोचली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 17 हजार 799 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 76286 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 31 लाख 36 हजार 232 वर पोहोचली आहे. जगभरात 9 लाख 53 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर मागील 24 तासात जगात 6351 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1035765 कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 59266 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 23822 लोकांचा मृत्यू झालाय. 232128 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,977 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 197,414 इतका आहे. Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.-
- फ्रांस: कोरोनाबाधित- 165,911, मृत्यू - 23,660
- यूके: कोरोनाबाधित- 161,145, मृत्यू - 21,678
- जर्मनी: कोरोनाबाधित- 159,912, मृत्यू - 6,314
- टर्की: कोरोनाबाधित- 114,653, मृत्यू - 2,992
- रशिया: कोरोनाबाधित- 93,558, मृत्यू - 867
- इरान: कोरोनाबाधित- 92,584, मृत्यू - 5,877
- चीन: कोरोनाबाधित- 82,836, मृत्यू - 4,633
- ब्राझिल: केस- 72,899, मृत्यू - 5,063
- कॅनडा: कोरोनाबाधित- 50,026, मृत्यू - 2,859
- भारत - कोरोनाबाधित- 31324, मृत्यू - 1008
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement