Coronavirus World Update | जगभरात 1.5 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; चीनमध्ये गेल्या 24 तासांत 1290 लोकांचा मृत्यू
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख पार पोहोचला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1.5 लाख पार गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1,54,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.
गेल्या 24 तासांत या देशांत आढळून आले सर्वाधिक रूग्ण
देश | एकूण कोरोनाग्रस्त | नवे रूग्ण |
अमेरिका | 709,201 | +31,631 |
स्पेन | 190,839 | +5,891 |
इटली | 172,434 | +3,493 |
फ्रान्स | 147,969 | +1,909 |
जर्मनी | 141,397 | +3,699 |
गेल्या 24 तासांत या देशांत कोरोनाचे सर्वाधिक बळी
देश | एकूण मृत्यू | गेल्या 24 तासांत मृत्यू |
अमेरिका | 37,135 | +2,516 |
चीन | 4,632 | +1,290 |
ब्रिटन | 14,576 | +847 |
फ्रान्स | 18,681 | +761 |
स्पेन | 20,002 | +687 |
जाणून घ्या जगभरातील कोरोनाचे परिणाम
चीनमध्ये पुन्हा कोरोनाने हैदोस घातला असून मृतांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 24 तासांत चीनमध्ये 50 टक्यांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत चीनमध्ये 1290 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 4632वर पोहोचला आहे. तसेच संसर्ग झालेल्यांचा आकड्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाली. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 325 नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 82,692 वर पोहोचली आहे.
चीनमधील जीडीपीमध्ये 1976 विनाशकारी सांस्कृतिक क्रांतीनंतर आतापर्यंत मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये 6.8 टक्यांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी उचलण्यात आलेल्या अप्रात्यक्षिक उपायांमुळे जगभरातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये मंदीचं सावट दिसून येत आहे.
याव्यतिरिक्त पाकिस्तानला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अमेरिकेकडून 8.4 मिलियन डॉलरची मदत करण्यात आली आहे. या मदतीची घोषणा अमेरिकेचे अॅबॅसिडर पॉल जोंस यांनी शुक्रवारी केली. तर जपानमधील लोकांना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून रोखण्यासाठी पंतप्रधानांच्या आदेशावर मोफत Abenomask वाटण्यात येत आहेत. पंतप्रधान शिंजो आबे यांचं नाव असलेले कापडाचे मास्क लोकांमध्ये वाटण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :
दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला! Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू