एक्स्प्लोर
चीनने चंद्रावर कापूस उगवला, आता बटाटा उगवण्याची तयारी!
चीनने चँग ई-4 हे यान 3 जानेवारीला चंद्राच्या दुसऱ्या भागावर उतरवला. याद्वारे चंद्राचा कधीही न पाहिलेला भाग जगाला पाहायला मिळाला.

बीजिंग : चीनने चंद्रावर कापूस उगवण्यात यश मिळवलं आहे. जीवसृष्टी नसलेल्या एखाद्या ग्रहावर किंवा उपग्रहावर रोप उगवल्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर रोपटं उगवण्यासाठी मानवाने केलेला हा पहिलाच प्रयोग असून त्यात चीनला यश आलं आहे. वैज्ञानिकांनी मंगळवारी ही माहिती दिली. आता चंद्रावर बटाटा उगवण्याचा चीनचा इरादा आहे.
चोंगकिंग युनिव्हर्सिटीच्या अॅडवान्स्ड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या फोटोंच्या मालिकेनुसार, "चँग ई-4 हे यान याच महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. त्यासोबत पाठवलेल्या एका डब्ब्यातील कापसाच्या बियांना अंकुर फुटला आहे.
"मानवाने चंद्राच्या पृष्ठभागावर जीवशास्त्रात झाडांच्या विकासासाठी प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं या प्रयोगाच्या डिझाईनचं नेतृत्त्व करणारे शाई गेंगशिन यांनी सांगितलं.
चीनची चँग 4 मोहीम फत्ते, चंद्राच्या अंधाऱ्या भागावर उतरलं यान
अंतराळ क्षेत्रात महाशक्ती बनण्याच्या दृष्टीने चीनने चँग ई-4 हे यान 3 जानेवारीला चंद्राच्या दुसऱ्या भागावर उतरवला. याद्वारे चंद्राचा कधीही न पाहिलेला भाग जगाला पाहायला मिळाला.
दुसऱ्या रोपांना अंकुर नाही
चोंगकिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हवा, पाणी आणि माती असलेला 18 सेंटीमीटरचा छोटा डबा यानातून पाठवला होता. त्यात कापूस, बटाटा आणि मोहरीच्या एक एक रोपांच्या बियांसह फ्रूट फ्लाय या कीटकाची अंडी आणि यीस्ट पाठवलं होतं. यानाने पाठवलेल्या फोटोंमध्ये कापसाला चांगलाच अंकुर फुटल्याचं दिसत आहे. पण इतर रोपांच्या बिया अंकुरित झाल्या आहेत की नाही, याबाबत काही समजू शकलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
