एक्स्प्लोर

युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर !

लंडन : युरोपियन युनियन ब्रिटन बाहेर पडल्याचं बीबीसीने म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीचा अधिकृत निकाल काही वेळात येत आहे. मात्र त्यापूर्वीच जगभरातील शेअर बाजाराने या निकालाचा धसका घेतला आहे.   ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिकांनी काल मतदान केलं. या जनमत चाचणीचा निकाल  आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.   युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे.   जनमत चाचणी *सार्वमत चाचणीत 4 कोटी 65 लाख 1 हजार दोनशे 41 (4,65,01,241) म्हणजेच 71.9 टक्के लोकांनी सहभाग घेतला होता. *50 टक्केपेक्षा जास्त मतं ज्या बाजूने पडतील तो निर्णय अंतिम असेल. *आतापर्यंत 51.8 टक्के जनतेनं बाहेर पडण्याच्या बाजूने आहे तर 48.2 टक्के युरोपियन महासंघातच राहण्याच्या. *युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने 1 कोटी 62 लाख 91 हजार 507 मतं पडली तर *युरोपियन महासंघातच राहवे असं वाटणारे 1 कोटी 51 लाख 47 हजार 795 मतं *23 हजार 906 मतं बाद झाली. *अजून जवळपास 9 फेऱ्या सव्वा कोटी मतांची मोजणी/विभागणी बाकी आहे. बाहेर पडण्याच्या बाजूने आणखी फक्त 37 हजार मतं हवी आहेत.  (हा आकडा प्रत्येक फेरीनंतर बदलतोय)   काय आहे युरोपियन युनियन?
  • 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे.
  • युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकतात आणि तिथं युरो हे एकच चलन वापरलं जातं.
  • 1973 मध्ये ब्रिटननं या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
  • पण बदललेल्या आर्थिक परिस्थितीत, खास करून निर्वासितांचे लोंढे वाढल्यावर युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याच्या मागणीनं ब्रिटनमध्ये जोर धरला आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला, तर त्याचे पडसाद जगभर उमटतील.
  ब्रिक्झिटचे भारतावर होणारे परिणाम
  • युरोपियन युनियन ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्यांसाठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
  • जवळपास 800 हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनमधून होते.
  • ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
  • ब्रेक्झिटमुळे युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वधारू शकतो. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल. तर जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम होईल.
  • युरोपियन युनियनमधून वेगळं झाल्यास ब्रिटनचा पैसा वाचेल, पण जवळपास दहा लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते.
  • हे सारं काही एका झटक्यात होणार नाही, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालवधी लागेल. पण निकाल काहीही लागला, तरी ही जनमत चाचणी युरोपचं आणि जगाचंही भवितव्य निश्चित करू शकते.

संबंधित बातम्या

ब्रेक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला ! 

ब्रिटनमधील जनमत चाचणीकडे जगाचं लक्ष 

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार का, जगाचं लक्ष ब्रिक्झेटकडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget