एक्स्प्लोर
पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, 22 जणांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पाराचिनारमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पाराचिनारमधील एका मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. स्थानिक सुन्नी पंथातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा स्फोट घडवल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या पाराचिनारमध्ये एका मशिदीमध्ये महिलांसाठीच्या प्रवेशद्वारावर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. आज शुक्रवारी दुपारी मशिदीमध्ये स्थानिक नागरीक नमाज अदा करण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. यात 22 जण मृत्यूमुखी तर 70 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर पाकिस्तानी सैन्यानं घटनास्थळी दाखल होत तातडीनं बचावकार्य सुरु केलं आहे. पाराचिनार हा पाकिस्तानच्या वायव्य भागातील आदिवासी प्रदेश आहे. या परिसरात शिया पंथाच्या मुस्लीम नागरिकांचं प्राबल्य आहे. त्यामुळे सुन्नी पंथातील धार्मिक कट्टरतावादी शिया नागरिकांना नेहमीच लक्ष्य करतात. यापूर्वी जानेवारी महिन्यात याच परिसरात झालेल्या स्फोटात 20 नागरिकांना आपला जीव गमावावा लागला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
क्रिकेट























