America Politics : कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; जो बायडन आपले सर्व अधिकार सोपवणार, पण का?
America Politics : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्याकडे सोपवणार आहेत.
America Politics : Joe Biden transferring his power to Kamala Harris : जगातील महसत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन काही दिवसांसाठी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.
व्हाइट हाऊसच्या वतीनं यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. व्हाइट हाउसकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, जो बायडन शुक्रवारी आपले सर्व अधिकार काही दिवसांसाठी कमला हॅरिस यांच्याकडे सुपूर्द करतील. ते पुढे म्हणाले की, बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना अॅनेस्थिसिया देण्यात येणार आहे. अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येण्यास त्यांना काही काळ लागेल. त्यामुळे ते पूर्णपणे अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या सर्व जबाबदाऱ्या कमला हॅरिस सांभाळणार आहेत.
कमला हॅरिस आणि जो बायडन यांच्यात टक्कर
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यात काही वाद झाल्याचं समोर आलं होतं. हॅरिस यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांचं मत गृहित धरलं जातंय, तर बायडन यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस अमेरिकेतील जनेतेसोबत खेळत आहेत. तसेच गेल्या महिन्यात जो बायडन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचं अप्रूवल रेटिंगही कमी आहे. त्यावेळी अशा चर्चाही रंगल्या होत्या की, कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदावरुन हटवलं जाऊ शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :