एक्स्प्लोर

Beed Morcha: 400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग

Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय देशमुख यांच्यावर गंभीर आरोप. बीडमधील मोर्चाकडे सर्वांचे लक्ष

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सहभागी होणार आहेत. या मोर्चात आजुबाजूच्या तब्बल 50 गावांमधील नागरिक सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना टाळण्यासाठी बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. 

बीडमधील सर्वपक्षीय मोर्चासाठी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल. त्यासाठी शहरात 400 अंमलदार, वाहतुकीचे 70 अंमलदार, वरिष्ठ अधिकारी 4 पोलीस उपाधीक्षक, इन्चार्ज ऑफिसर, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक तैनात असतील. या सर्व अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली याव्यतिरिक्त  दंगल नियंत्रण पथक अर्थात आरसीपीची 6 पथके, राज्या राखीव पोलीस दलाच्या 2 एसआरपीएफ कंपनी आणि अधिक अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. या मोर्चामुळे बीड शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. ज्या मार्गावरुन मोर्चा जाणार आहे, तिथे विशेष खबरदारी बाळगण्यात येणार आहे. मोर्चा ज्या भागातून जाईल तेथील इमारतींवर नजर ठेवली जाणार आहे. या मोर्चात वाहनांना प्रवेश देऊ नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाकडून मोर्चेकऱ्यांना करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आल्याने याबाबतची अधिक माहिती सीआयडीच्या माध्यमातून दिली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठीचा सरकारवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून हत्याप्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची चौकशी केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये तळ ठोकून आहेत. कालच प्रशांत बोरुडे यांनी बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांकडून याप्रकरणाची माहिती घेतली होती. यानंतर आज दुसऱ्या दिवशीही  सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे बीड शहर पोलीस स्टेशनमधून तपासाची सूत्रे हाताळत आहेत.

संतोष देशमुखांच्या मुलीचं भावनिक आवाहन

संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुख यांची कन्या आणि मुलगा या मोर्च्यात हजर होते. यावेळी वैभवी संतोष देशमुख हिने एक छोटेखानी भाषण केले. आमच्या परिवाराच्या मागे आपण उभे राहा, या प्रकरणातील दोषी लोकांना तात्काळ जेरबंद करून कडक कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या मुलीने केली. तसेच सरकारने ठोस पाऊल नाही उचलले तर एक जानेवारीला रेणापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

आणखी वाचा

धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली, 'त्या' सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या: बीड प्रकरणावर अमोल मिटकरी काय म्हणाले? 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget