Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Lamborghini Video Viral : या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, अत्यंत महागड्या आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज कारदेखील लोकांना सुरक्षिततेची हमी देतात की नाही?
Lamborghini Fire Accident : व्होल्वो कारच्या अपघाताला अवघे काही दिवस झाले असतानाच आणखी एक आलिशान कार अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनीला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, अत्यंत महागड्या आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज कारदेखील लोकांना सुरक्षिततेची हमी देतात की नाही?
लॅम्बोर्गिनीला आग लागली
लॅम्बोर्गिनीला आग लागल्याची घटना ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ द रेमंड लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच गौतम सिंघानिया यांनी कारच्या सुरक्षेच्या मानकांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. गौतम सिंघानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला लॅम्बोर्गिनीमधून धूर निघताना दिसत आहे आणि काही वेळातच कारला आग लागली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही लक्झरी कार म्हणजे लॅम्बोर्गिनी रिव्हल्टो. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.89 कोटी रुपये आहे.
Spotted by me: A Lamborghini engulfed in flames on Coastal Road, Mumbai. Incidents like this raise serious concerns about the reliability and safety standards of Lamborghini. For the price and reputation, one expects uncompromising quality—not potential hazards.@MumbaiPolice… pic.twitter.com/lIC7mYtoCB
— Gautam Singhania (@SinghaniaGautam) December 25, 2024
व्होल्वो रस्ता अपघात
नुकतेच कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये व्होल्वो कारवर कंटेनर पडून कारमध्ये बसलेल्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. ही कार होती Volvo XC90, जी जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. या वाहनाच्या क्रॅश चाचणीत विटांनी भरलेला कंटेनर गाडीवर कोसळण्यात आला होता. त्यामध्ये कंटेनर जरी पडला तरी वाहनात बसलेल्या कोणालाही इजा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र बेंगळुरूमध्ये झालेल्या अपघातात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या