(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेमात ब्रेक अप झाल्यानंतर कवितेतून वेदना मांडल्या; लिलावात मिळाले चार कोटी रुपये
ब्रेक अप झाल्यानंतर अनेकजण देवदास होतात, अनेकजण कविता करु लागतात. अशाच एका कवितेला लिलावात तब्बल 3.89 कोटी रुपये मिळाले आहेत.
Break Up Poem : 'टुटे हुवे दिल से ही दर्द भरी आवाज निकली है...' असं म्हटलं जातं. ब्रेक अप झाल्यानंतर अनेकांना हे जीवनच संपल्याचा भास होतोय. कोणी देवदास होतोय तर कोणी कविता करायला लागतोय. अनेकांना शायरी सुचते. आयुष्यात खूप काही गमावल्याचा फील येतो. पण हे ब्रेक अप तात्पुरतं वेदना देणारं असलं तरी ते अनेक वेळा फायद्याचंही ठरतं. असाच अनुभव ब्रिटनच्या आर्क हेड्सला (Arch Hades) आला आहे. तिच्या आयुष्यात ब्रेक अपचं दु:ख अशा पद्धतीने आलं की ती एकदम प्रसिद्ध झाली. आपल्या भावना मांडताना तिने एक कविता केली आणि एका लिलावामध्ये त्या कवितेला तब्बल 3.89 कोटी रुपये मिळाले.
आर्क हेड्स ही एक ग्लॅमरस इन्स्टाग्राम इन्फ्युएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.आर्क हेड्सचे ब्रेक अप झाल्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी तिने एक कविता लिहिली. आता ती कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या कवितेला न्यूयॉर्कमधील क्रिस्टिज लिलावात तब्बत तीन कोटी 89 लाख रुपये मिळाले आहेत. या कवितेची खरेदी ग्रॅमी अवार्ड विजेते संगितकार आरएसी यांनी केली आहे. आर्क हेड्स हे तिचे मूळ नाव नाही तर ती या टोपन नावाने कविता लिहिते. पाच वर्षाच्या संसारानंतर तिचे ब्रेक अप झाले. त्यानंतर या तिने कविता लिहायला सुरुवात केली. तिच्या बहुतांश कविता या ब्रेक अपवर आधारित आहेत.
आर्क हेड्सने लिहिलेली ही कविता 102 ओळींची आहे तर त्यामध्ये 1000 शब्द आहेत. आता या कवितेला तीन कोटी 89 लाख रुपये मिळाले आहेत. त्यावरून विचार करा की या कवितेतील एक-एक शब्द किती महत्वाचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Viral News : या चित्रात मांजर शोधून दाखवा...ट्विटरवर लोक हैराण झालेत पण...
- नंदीबैलाने स्वीकारले 'फोन पे'ने पैसे, डिजिटल इंडियाचा अजून काय पुरावा हवा? आनंद महिंद्रांनी केला व्हिडीओ शेअर
- Viral Video : मुलीने अजगराचा किस घेतला अन्...पुढे काय घडलं ते पहाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha