एक्स्प्लोर

Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक

Chhatrapati Sambhajinagar Bogus Bharti : आरोपींनी तरुणांना फसवण्यासाठी हुबेहुब मैदानी चाचणीचे आयोजन केलं होतं. सिलेक्ट झालेल्या उमेदवारांकडून पैशाची मागणी केल्यानंतर मात्र त्यांचं बिंग फुटलं. 

छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान बनवण्याचे आमिष दाखवून तिघांनी चक्क बोगस भरतीचे आयोजन केले. पोलिस भरती प्रमाणे त्यांची मैदानी चाचणी देखील घेण्यात आली. पात्र उमेदवारांना पैशांची मागणी करताच या टोळीचा भांडाफोड झाला आणि त्यांची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा नाट्यमय घोटाळा उघडकीस आला.  या प्रकरणीविशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव या घोटाळेबाजांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व पंढरपूरचे राहणारे असून सिटी चौक पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर 17 डिसेंबरच्या सकाळी हुबेहूब पोलीस भरतीसाठी भरती आयोजित केली गेली. भल्या पहाटेच अनेक तरुण हजर झाले. सर्व उमेदवारांना एका रांगेमध्ये उभे करण्यात आले. लष्कराप्रमाणे शिस्त समजून सांगून भरतीची प्रक्रिया, पगार निकष सांगण्यात आले. कागदपत्रं गोळा करून सर्वांची मैदानी चाचणी घेतली. यातील 92 जणांना आरोपींनी संपर्क करून 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुन्हा त्याच मैदानावर अंतिम प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते.

Chhatrapati Sambhajinagar Bogus Bharti : पोलिस भरती प्रमाणे हुबेहूब मैदानी चाचणी

17 डिसेंबर रोजी पोलिस भरती प्रमाणे हुबेहूब उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यात 1200 मीटर धावणे (25 गुण), गोळा फेक (25 गुण) अशी रचना होती. 25 डिसेंबर रोजी येताना नियुक्त उमेदवारांनी 6 हजार रुपये घेऊन येण्याची सूचना करण्यात आली. परंतु बागुल आणि त्याच्या मित्रांना तेव्हाच संशय आला. 

सदर भरती बाबत परवानगी व काही कागदपत्रांची मागणी केली आणि आणि आरोपींची बोबडी वळली. तोपर्यंत सर्वांनीच सहा हजार रुपये त्यांना ऑनलाईन ट्रान्सफर केले होते. संतप्त उमेदवारांनी तिघांना पकडून सिटीचौक पोलीस ठाण्यात हजर केले. निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या आदेशावरून निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.

नियुक्ती आणि गणवेश शुल्क 6 हजार

आरोपींनी पात्र उमेदवारांना कंत्राटी स्वरूपाची भरती सांगून 11 महिन्यांचा करार बंधनकारक असल्याचं सांगितलं. बारा हजार रुपये मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र नियुक्ती व गणवेशासाठी 6 हजारांची मागणी केली. 

आरोपी विशालचा भाऊ लष्करात जवान आहे. सनीने सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. विशाल व विकास मात्र बारावी पास आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा म्हणून ते नेहमी लष्कराच्या गणवेशात असायचे. मात्र काही तरुणांनी शंका उपस्थित केली आणि अनेक तरुण फसगतीपासून वाचले. आता हा तीनही आरोपी जेलची हवा खात आहेत. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Embed widget