![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amazon | अॅमेझॉनचे जेफ बेझोस CEO पदावरुन पायउतार, अॅन्डी जेसींकडे धुरा
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) हे आपल्या पदावरुन पायउतार झाले असून आता ते कंपनी बोर्डचे नवे कार्यकारी अध्यक्ष असतील. अॅमेझॉनच्या सीईओपदी आता अॅन्डी जेसी (Andy Jassy) यांची निवड झाली असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
![Amazon | अॅमेझॉनचे जेफ बेझोस CEO पदावरुन पायउतार, अॅन्डी जेसींकडे धुरा Amazon founder Jeff Bezos to step down as CEO Andy Jassy to be next CEO Amazon | अॅमेझॉनचे जेफ बेझोस CEO पदावरुन पायउतार, अॅन्डी जेसींकडे धुरा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/25202820/jeff-bezos.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amazon: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे आपल्या पदावरुन पायउतार झाले आहेत. आता त्यांची जागा कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी घेतील. हा बदल या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत करण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
जेफ बेझोस यांची निवड कंपनीचे बोर्ड कार्यकारी अध्यक्ष म्हणून केली असल्याची घोषणा अॅमेझॉनने केली आहे. सन 1994 साली जेफ बेझोस यांनी अॅमेझॉनची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ एक ऑनलाईन बुकस्टोअर असलेल्या अॅमेझॉनचे रुपांतर आज जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीमध्ये झाले आहे. आज अॅमेझॉनकडून जगातील सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात.
ईडीचा अॅमेझॉनविरोधात तपास सुरु, FEMA च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका
जेफ बेझोस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून अॅन्डी जेसींकडे कंपनीच्या सीईओपदाची धुरा सोपवत असल्याचं सांगत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते आपल्या पत्रात म्हणाले की, "मला अॅमेझॉन कंपनीचा बोर्डचे कार्यकारी अधिकारी आणि अॅन्डी जेसी यांनी सीईओ बनवण्यात आले आहे, याचा मला आनंद होतोय. या नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहाने आणि उमेदीने काम करेन. अॅन्डी जेसीवर माझा पूर्ण भरवसा आहे."
जेफ बेझोस यांनी आपल्या पत्रात पुढं म्हटलंय की, "हा प्रवास जवळपास 27 वर्षापूर्वी सुरु झाला होता. अॅमेझॉन केवळ एक विचार होता, त्यावेळी त्याचे काहीच नाव नव्हतं. त्यावेळी मला विचारण्यात यायचं की इंटरनेट काय आहे? आज आपण 13 लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना रोजगार देतोय. कोट्यवधी ग्राहकांना आपली सेवा पुरवतोय आणि विस्तृत स्वरुपात जगातील सर्वात यशस्वी कंपनीच्या प्रस्थापित झालोय."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)