एक्स्प्लोर

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय खेळी; महायुतीच्या ‘या’ नेत्याच्या पत्नीच्या नावाची चर्चा

Maharashtra Politics: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी यांनी आपला दावा केला असतानाच, आता या जागेसाठी महायुतीकडून मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Maharashtra Politics: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे.

यवतमाळ-वाशिम (Yavatmal Washim लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपला दावा केला असतानाच, आता या जागेसाठी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.  

पंतप्रधानाच्या भेटीनंतर अनेक चर्चाना उधाण

साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर  'मै मेरी  झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे संकेत दिले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांच्या नावाची याच मतदारसंघातून वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नुकत्याच यवतमाळच्या महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ येथे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत असून अनेक चर्चाना उधाण आले आहे. सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आपला संपर्क देखील वाढविला आहे. 

बंजारा समाजाची महिला उमेदवार 

जानेवारी महिन्यात महायुतीचा जिल्ह्यात पहिला मेळावा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात बंजारा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती.  त्यामुळे मेळाव्यातील त्यांचे सूचक विधान आता यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या महिला उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे देखील बोलले जात आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येत असून भाजप 4 मतदारसंघात भाजप तर दोन मतदारसंघ महायुतीचे घटक आहे. त्यामुळे उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर असावा, अशी मागणीही भाजपकडून वरीष्ठकडे केली आहे. 

कोण आहेत मोहिनी नाईक?

मोहिनी नाईक यांना नाईक घराण्याचा राजकीय वारसा लाभला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या त्या नातसून आहेत. तर माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या त्या सून आहेत. सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या त्या पत्नी आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget