Yavatmal Washim : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; वाशिम-यवतमाळ ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
Yavatmal Washim: यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे.
Yavatmal Washim वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज वाशिमच्या (Washim) दौऱ्यावर आहेत. स्थानिक खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या पुढाकाराने वाशिम शहरात होत असलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाशिम दौरा यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी या मतदार संघावर आपला दावा असल्याचे वेळोवेळी बोलून दाखवले आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार भावना गवळी यांनी उबाठा मोठा धक्का दिला आहे.
आज वाशिम येथे होत असलेल्या महिला मेळाव्याच्या दरम्यान यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील 84 आजी-माजी सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणी जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.
निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिम दौऱ्यावर आहेत. स्थानिक खासदार भावना गवळी यांनी उभारलेल्या राज्यातील एकमेव शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे ते उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाशिम शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत छत्रपती संभाजी राजे आणि महादेव जानकर असणार आहेत. साधारणतः एकाच आठवड्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 84 आजी-माजी सरपंच, नगर सेवक, पंचायत समिती सदस्य आणी जिल्हा परिषद सदस्य उबाठा गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
'मै मेरी झांशी नहीं दूंगी' - भावना गवळी
'मै मेरी झांशी नहीं दूंगी' या ऐतिहासिक घोषणेचा जयघोष करत शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. महायुतीमध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभेची जागा ही आमच्यासाठी सुखरूप असून आपण ही जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार देखील भावना गवळी यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या