एक्स्प्लोर

Shirpur : शिरपूरच्या जैन मंदिरात पुन्हा वाद उफाळला, देवाच्या दारातच श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये लाठ्याकाठ्यांनी हाणामारी

Shirpur Jain Mandir : श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांना पूजेसाठी ठराविक वेळ देऊन हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

वाशिम: जैन धर्मियांची काशी असलेल्या वाशिमच्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरात पुन्हा एकदा दोन्ही पंथीयांमध्ये वाद होत हाणामारीची घटना घडली. शिरपूरच्या भगवान पार्श्वनाथ मंदिरात दोन्ही पंथिय पूजेसाठी पोहोचले असता पूजेवरून चांगलीच हाणामारी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्ती केली. 

वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमध्ये कायम वाद होत असतात. आज मात्र या वादाचं पर्यवसन थेट हाणामारीत झालंय. या घटनेनंतर दोन्ही पंथीयांच्या भक्तांनी मंदिराबाहेरच ठिय्या दिला आणि घोषणाबाजी केली. 

लाकडी काठ्यांनी एकमेकांना भिडले 

शिरपूर जैन येथील मंदिर परिसरात आजची सकाळी नेहमीसारखीच होती. भाविक येत होते. ठरल्याप्रमाने सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंतची वेळ ही श्वेतांबर पंथियांना ठरविण्यात आलेली आहे. तर दिगंबर पंथियांसाठी सकाळी 9 ते 12 ही वेळ पूजेसाठी देण्यात आलेली आहे. मात्र या दरम्यान दिगंबर पंथीयांची एक वृद्ध महिला आणि तीन ते चार भाविक दर्शन रांगेत घुसल्याचं कारण देत वाद निर्माण झाला. नंतर या वादाचं पर्यवसन हे हाणामारीत झालं. दोन्ही बाजूंकडून लाकडी काठ्या आणि दंडुक्याच्या साहाय्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्ही पंथियांनी मंदिराच्या बाहेर ठिय्या मांडला होता. त्यामुळे मंदिर परिसरात तणावाचं वातावरण होतं. खरं तर काही महिन्यांपूर्वी अटी शर्थींवर हे मंदिर भाविकांसाठी उघडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली होती. मंदिर उघडल्यावरही लेपन प्रक्रियेवरून वाद उफाळून आला होता. मात्र प्रशासनाच्या मध्यस्तीनं तो वाद मिटला. त्यात आजच्या घटनेची भर पडली आहे. त्यामुळे या वादावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न, मंत्र्याचा हात असल्याचा आरोप 

दिगंबर  पंथीयांकडून महाराष्ट्रातील दिगंबर समाजातील जैन धर्मियांच्या अनुयायींवर  गुजराती श्वेतांबर  पंथीयांकडून दादागिरी आणि मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसचे मंदिरावर ताबा मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात असून त्यामध्ये राज्यातील एका मंत्र्याचा हात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

जगात अनेक जातीधर्माचे आणि पंथाचे लोक आपापल्या दैवताला मानतात आणि त्यांनी दिलेला संदेश उराशी बाळगून त्याच्या शिकवणीचे आचरण करण्याचा  प्रयत्न करतात. मात्र जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोरच त्यांचे अनुयायी एकमेकांना भिडत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

ही बातमी वाचा: 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget