बहुचर्चित ठरलेल्या महिला न्यायाधीशांची अखेर मुंबईत बदली, वर्धा वकील संघाने दिला होता सत्याग्रह आंदोलनाचा इशारा
वर्धाच्या वकील संघाने (Wardha Lawyers Association) न्यायाधीश-1 मोनिका आरलंड यांच्या विरुद्ध कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.
![बहुचर्चित ठरलेल्या महिला न्यायाधीशांची अखेर मुंबईत बदली, वर्धा वकील संघाने दिला होता सत्याग्रह आंदोलनाचा इशारा The popular women judges are finally transferred to Mumbai the Wardha Lawyers Association warned of satyagraha movement बहुचर्चित ठरलेल्या महिला न्यायाधीशांची अखेर मुंबईत बदली, वर्धा वकील संघाने दिला होता सत्याग्रह आंदोलनाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/10/27b584bc296ba97b1e8e85c9fad935a81665395005209440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Wardha : वर्ध्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील (District and Sessions Court) न्यायाधीश-1 मोनिका आरलंड यांची 7 ऑक्टोबरच्या आदेशानुसार मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. वर्धा वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करण्यात आलं होतं त्यामुळे हा विषय बहुचर्चित ठरला होता. बदलीसांदर्भात लेखी सूचना वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायालय प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिला न्यायाधीश मोनिका आरलंड यांनी त्यांच्या वर्धा येथील कर्तव्यकाळात न्यायदानाचे काम करताना अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. असे असले तरी त्यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत वर्धाच्या वकील संघाने (Wardha Lawyers Association) त्यांच्याविरुद्ध कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना निवेदन दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.
वकील संघाने दिला होता सत्याग्रह आंदोलनाचा इशारा
वर्धा वकील संघाच्या वतीने उद्या, 11 ऑक्टोबरला सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन सात ऑक्टोबरला निर्गमित झालेल्या आदेशानुसार वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश-1 मोनिका आरलंड यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
न्यायाधीश एन. बी. शिंदे यांच्याकडे कार्यभार
न्यायाधीश-1 मोनिका आरलंड यांची मुंबई येथे बदली झाल्याने वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश-1 म्हणून न्यायाधीश एन. बी. शिंदे यांच्याकडे कार्यभार असणार आहे. तसे लेखी आदेशही वर्धा जिल्हा व सत्र न्यायालय प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.
न्यायाधीश-2 ची जबाबदारी न्या. आर. व्ही. अदोने यांच्याकडे
न्यायाधीश मोनिका आरलंड यांची मुंबई येथे बदली झाली. त्यामुळे न्यायाधीश-2 एन. बी. शिंदे हे न्यायाधीश-1 ची जबाबदारी सांभाळतील. तर वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश-2 ची जबाबदारी न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांच्याकडे देण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)