एक्स्प्लोर

हे सरकार शेतकरी विरोधी, कंगाल आणि दारुड्यासारखे : प्रकाश आंबेडकर

JNU प्रकरणात भाजपची वृत्ती दिसून येते, हे सगळं त्यांच्याकडून घडवलं जात आहे. ते याला शहरी आतंकवादी असे म्हणतात, मात्र या देशातील खरा आतंकवादी हा RSS आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

मुंबई : या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्या सारखे सरकार आहे. तर RSS हे देशातील आतंकवादी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली.  मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद निकालावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या निकालाने समाधानी आहे. लोकांची कामं केली म्हणून आम्हाला अकोल्यात सत्ता दिली. तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये आमचे सदस्य निवडून आले आहेत. या वेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्राचे सरकार हे कंगाल आणि दारुडे सरकार अशी अवस्था आहे. सरकारी तिजोरी खाली झाली आहे. ही गोष्ट सरकार लपवत आहे. शासन चालविण्यासाठी 13 लाख कोटी सरासरी लागतील असा अंदाज आहे. नवीन बजेट येईपर्यंत उरलेली रक्कम जमेल का अशी शंका आहे. शासन चालविण्यासाठी पैसे कुठून येणार ? असा सवाल त्यांनी केला आहे. 12 लाख कोटींची तूट केंद्र सरकारला पडणार आहे. दारूडा जसा घरातील वस्तू विकतो, तसं हे सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच विकण्याचा डाव आहे. असही आंबेडकर म्हणाले. हेही वाचा- Special Report | नागरिकत्व दुरुस्ती कायदा 40 टक्के हिंदुच्या विरोधात? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यात किती अमेरिका - इराण युद्ध सुरू झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटबंदी दरम्यान एनआरआय लोकांना शासनाने पैसे डिपॉझिट करण्यात सूट दिली होती, याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने द्यावी. देशाची आर्थिक स्थिती लपविण्यासाठी CAA, NRC मुद्दे भाजप कडून पुढे केले जात आहेत, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस हे शेतात जे पिकतं त्याच्या नव्हे तर त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरील प्रेमी आहे, असे आंबेडकर म्हणाले. आंबेडकर म्हणाले की, JNU प्रकरणात भाजपची वृत्ती दिसून येते, हे सगळं त्यांच्याकडून घडवलं जात आहे. ते याला शहरी आतंकवादी असे म्हणतात, मात्र या देशातील खरा आतंकवादी हा RSS आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. संबंधित बातम्या 'वंचित'ला भाजपची बी टीम म्हणणारे आता काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेची बी टीम म्हणणार का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल  CAA आणि NRC चा फटका हिंदूंना अधिक, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट  Prakash Ambedkar | भाजपकडून देशाची आर्थिक स्थिती लपवली जाते : प्रकाश आंबेडकर | ABP Majha Vanchit Bahujan Aghadi against CAA | सीएए, एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांचं धरणं | ABP

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 October 2026: आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा तिसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget