(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC Prelims 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रीलिम परीक्षेचा निकाल जाहीर, कुठे आणि कसा पाहाल निकाल?
UPSC Prelims 2023 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रिलिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मु्ख्य परीक्षा देता येणार आहे.
UPSC Prelims 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) 28 मे रोजी घेण्यात आलेल्या पू्र्वपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 14, 624 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देण्यास पात्र झाले आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. तरच या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या अर्जाची नियमावली आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
कुठे आणि कसा पाहाल निकाल?
तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ https://upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण आणि कट ऑफ गुण पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काही प्रश्नपत्रिका देखील त्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकराचा संभ्रम निर्माण न करता संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे.
UPSC Prelims 2023 result Out
— Upsc Civil Services Exam (@UpscforAll) June 12, 2023
Check here 👇https://t.co/UIuby3QAwI
तीन टप्प्यात UPSC परीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. आधी प्रीलिम परीक्षा होते, त्यानंतर मुख्य आणि नंतर मुलाखत फेरी. विद्यार्थ्यांना आयपीएस, आएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या तिन्ही फेऱ्यामध्ये यश संपादन करावे लागते. त्यामुळे आता प्रीलिम परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुख्य परीक्षेची तयारी करता येणार आहे. या परीक्षांसंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आयोगाकडून संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणार आहे.
यूपीएससी परीक्षा 2022 निकालात मुलींची बाजी
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारत अव्वल स्थान मिळवले. या निकालात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली. इशिता किशोर ही देशातून पहिली आली तर गरिमा लोहिया ही देशातून दुसरी आणि उमा हरिथी ही तिसरी आली. तर महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली. त्यामुळे यंदाच्या परीक्षेचा निकाल काय लागतो याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
MHT CET Result 2023 : एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर, 'ही' घ्या थेट लिंक
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI