एक्स्प्लोर

उल्हासनगरमध्ये 78 जागांसाठी 482 उमेदवार

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या 78 जागांसाठी 482 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तब्बल 79 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात लढत आहेच, पण दोन्ही पक्षांना स्थानिक साई पक्षाचं कडवं आव्हान आहे. याशिवाय विशिष्ट प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, रिपाइं, भारिप, बसपा आदी पक्षांचंही वर्चस्व आहे. यावेळी उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांनी भाजपला साथ दिली आहे. टीम ओमी कलानी सोबत आल्याने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र ओमी कलानींचा अर्जच बाद झाला आहे. भाजपचे नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप आणि कलानींच्या एकूण 70 उमेदवारांना कमळ तर टीमच्या 4 जणांना रासप पक्षाचे नगारा चिन्हे दिले. रिपाइं आठवले गटाच्या लता निकम, पीआरपीचे प्रमोद टाले, शारदा अंभोरे तर एका अपक्षाला भाजप पुरस्कृत केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना उमेदवारी नाकारल्याने, त्यांनी साई पक्षाच्या तिकिटावरुन रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ओमी टीममधील मोहन कंडारे, त्रिलोकाणी, पंडित निकम, विकास खरात यांच्यासह अनेक राष्ट्रवादी आणि साई पक्षाला जवळ करून रिंगणात उतरले आहेत. शिवसेना नगरसेवक प्रधान पाटील, नगरसेविका समिधा कोरडे, जयेंद्र मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रभाग क्र-२० मधील तिन्ही उमेदवार सुरक्षित झाले. भाजपा-साई पक्षाने मराठी उमेदवार रिंगणात उतरवून रंगत वाढविली आहे. साई पक्षाने 59 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये प्रमुख जीवन इदनानी आणि माजी महापौर आशा इदनानी यांनी दोन प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीचे 42, साई पक्षाचे 59, भारिपचे 12, मनसे 23, बीएसपीचे 22 आदीसह 479 उमेदवार रिंगणात आहेत आहेत. संबंधित बातम्या

उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद

उल्हासनगरमध्ये रिपाइंचा भाजप, टीम ओमी कलानींना धक्का

ओमी कलानींची हातात तलवार घेऊन स्टेजवर एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Watched 'Dharmaveer 2' :धर्मवीर-2 पाहण्यासाठी मुख्यमंत्री थेट थिएटरमध्ये, प्रसाद ओकही सोबतMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024Yuvasena Win  Senate : 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी, ठाकरेंचा डंकाTop 70 at 7AM Morning News  24 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Karvi Flower: कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
कास पठार अवतरलं लोणावळ्यात! 7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल पुण्यात, यंदा नाही पाहिली तर पुन्हा वाट पाहावी लागणार
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Embed widget