एक्स्प्लोर

संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

पीडित नितीन अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, मी दुकानी नव्हतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची नोटीस न देता प्रशासनाने माझ्या दुकानातील सामानाची तोडफोड केली.

रायपूर : छत्तीसगढच्या मनेंद्रगढ पोलीस ठाणे हद्दीतील मौहारपारामध्ये चक्क तहसीलदार महोदयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल झाला असून अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर झालेल्या वादातूनही ही घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील प्रशासन विभागाकडून अतिक्रमण हटविण्यात येत होते, तहसीलदार (Tehsildar) यजवेंद्र कैवर्त आणि प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात ही अतिक्रमण मोहीम सुरू होती. यावेळी, नितीन अग्रवाल नावाच्या व्यक्तीने तहसीलदार यजवेंद्र यांच्यासोबत वाद घालत त्यांना चक्क मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून (Social media) व्हायरल झाला आहे. शहरातील स्कूल भवन आणि नाल्याजवळ करण्यात आलेलं अतिक्रमण हटविण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती. त्यासाठी आमची टीम घटनास्थळी दाखल होऊन अतिक्रमण हटविण्याचं काम करत होती, त्यावेळी नितीन अग्रवाल यांनी माझ्यासोबत शिवीगाळ करत मला मारहाण केली. आमच्या पथकाने तेथील सामान हटविण्याचं काम करताना, अग्रवाल यांनी धमकी देत धक्काबुक्की केल्याचं तहसीलदार यजवेंद्र यांनी म्हटलं. 

पीडित नितीन अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, मी दुकानी नव्हतो, तेव्हा कुठल्याही प्रकारची नोटीस न देता प्रशासनाने माझ्या दुकानातील सामानाची तोडफोड केली. जेसीबीच्या सहाय्याने सामानाची तोडफोड करुन माझं दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर, प्रत्यक्षदर्शी असलेल्या विवेक पांडे यांनीही यास दुजोरा दिला असून, प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. तसेच, नितीन यांनी काही वेळ मागितता होता. मात्र, पोलिसांनी नितीन यांना पोलीस गाडीत बसवलं अन् सामानाची तोडफोड केल्याचं पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिला. पण, या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मारहाण करणाऱ्या युवकावर संताप व्यक्त केला. मात्र, वस्तूस्थिती समजल्यानंतर प्रशासनाविरूद्धही रोष व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान, अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक उकसवण्याचा प्रयत्न केल्यानेच वादाला सुरुवात झाली, त्यातून नितीन यांनी मारहाण केली. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होती. नितीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य न केल्यानेच हे अतिक्रमण हटविण्यात आल्याचं तहसीलदार यजवेंद्र यांनी म्हटलं आहे. तर, आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा

मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget