Viral Video : इंदौरमध्ये सर्वात मोठ्या मानवी साखळीने बनवला भारताचा नकाशा; रचला जागतिक विक्रम, व्हिडीओ व्हायरल
Independence Day 2022 : स्वातंत्र्यदिनानिमित्त इंदौरमध्ये सर्वात मोठ्या मानवी साखळीद्वारे भारताचा भौगोलिक नकाशा बनवण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे.
Independence Day 2022 : आज देशात सर्वच ठिकाणी स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. याच निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2022) इंदौरमध्ये सर्वात मोठ्या मानवी साखळीद्वारे भारताचा भौगोलिक नकाशा बनवण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. 'ज्वाला' या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात तब्बल 5000 हून अधिक शालेय विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि इतरांनी एकत्र येऊन नकाशा तयार केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देशाचा नकाशा बनवणाऱ्या या सर्वात मोठ्या मानवी साखळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या माध्यमातून भौगोलिक आकारमानात मानवी साखळी बनवण्याचा विश्वविक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ज्वाला या सामाजिक संस्थेच्या संस्थापक डॉ. दिव्या गुप्ता यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ :
Indore sees World Book of Records for largest human chain forming India's map
— ANI Digital (@ani_digital) August 14, 2022
Read @ANI Story | https://t.co/6Gj0OCMHMM#IndiaAt75 #Indore #AzadiKaAmritMahotsav #IndependenceDay2022 pic.twitter.com/PDzDg2zCt8
5000 हून अधिक लोकांची उपस्थिती :
डॉ. दिव्या गुप्ता यांनी पुढे माहिती दिली की, “आम्ही भारताच्या नकाशावर केवळ सीमेवरच नव्हे तर त्याच्या आतही मानवी साखळी केली आहे. या कार्यक्रमात एकूण 5,335 लोक सहभागी झाले होते. त्या पुढे म्हणाले की, "देशातील महिलांचे महत्त्व आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी भारताच्या नकाशाच्या सीमेवर श्रीशक्तीचे दर्शन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे."
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा
आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरु केली. या मोहीमेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहण्यास मिळाला.
महत्वाच्या बातम्या :
- Trending News : चंदीगडमध्ये जागतिक विक्रम; तब्बल 7500 विद्यार्थ्यांनी बनवला मानवी ध्वज, पाहा व्हिडीओ
- 75th independence day : रस्त्यावरुन जात होती तिरंगा यात्रा, वृद्ध व्यक्तीने पाहताच केला सलाम, व्हिडीओ व्हायरल
- PM Modi : वयाच्या शंभरीतही PM मोदींच्या मातोश्रींची देशभक्ती पाहून सारेच आश्चर्यचकित, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव