(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Resignation : 10-10 मिनिटांचा टॉयलेट ब्रेक का? भडकणाऱ्या बॉसला वैतागली, तरुणीने तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली!
Toxic Job Resignation : एका तरुणीने बॉसच्या कुरबुरीला कंटाळून तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली. टॉयलेट ब्रेकच्या वेळेवरून बॉस तिच्यावर वैतागला. यानंतर तरुणीने थेट नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी राजीनामा दिला.
Women Resigns from Job : सध्याच्या स्पर्धेच्या युगात मनासारखी नोकरी (Jobs) मिळवणं कठीण आहे. त्यातच नोकरी मिळाल्यावर ऑफिसमधील वातावरण आणि कार्यपद्धतीशी जुळवून घेणं म्हणजे एक कसरत होते. नवीन वातावरण आणि ऑफिसमधील काम करण्याची पद्धत यासोबत जुळवून घ्यायला अनेकांना वेळ लागतो. अशातच एका तरुणीने बॉसच्या कुरबुरीला कंटाळून तिसऱ्याच दिवशी नोकरी सोडली. मुळात झालं असं की, टॉयलेट ब्रेकच्या वेळेवरून तरुणीचा बॉस तिच्यावर वैतागला. यानंतर तरुणीने थेट नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी राजीनामा दिला.
'टॉयलेट ब्रेक' घेतल्याने भडकला बॉस
या तरुणीने रेडिट (Reddit) वर एक लांब लचक पोस्ट करत तिचा अनुभव सांगितल आहे. त्यामध्ये तरुणीने लिहिलं आहे की, ''मी सोमवारी एका कंपनीत कामाला सुरुवात केली. पण बुधवारी मी कामाचा राजीनामा दिला. बॉस माझ्यावर ओरडला आणि यामुळे मी नोकरी सोडली.'' तिने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, नोकरी सोडण्याच्या तिच्चा निर्णय योग्य आहे की नाही यावर इतरांची प्रतिक्रिया मागितली आहे. तिच्या पोस्टमधील माहितीनुसार, बॉस तिच्यावर अनेक अयोग्य कारणांसाठी भाडकला, ज्यामुळे तिला तिच्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
अवघ्या तीन दिवसांतच नोकरी सोडली
रेडिट (Reddit) वर एका महिलेने एका छोट्या कंपनीत जॉइन केल्याच्या अवघ्या तीन दिवसात नोकरी सोडल्याचा तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. रेडिटवर @QueenMangosteen या नावाच्या अज्ञात महिलेने, "Anti work" subreddit वर आता व्हायरल पोस्ट अपलोड केली. या पोस्टला15,000 पेक्षा जास्त जणांनी ही पाहिली आणि 2,200 हून अधिक युजर्सने यावर कमेंट केल्या आहेत.
नेमकं घडलं काय?
यानंतर नेटकऱ्यांनी तिला नोकरी सोडण्यामागचं कारण विचारलं. यावर तरुणीने सांगितलं की, तिच्या बॉसने तिला प्रश्न विचारला होता की, ती तिचे काम का करत नाही, ज्यामुळे तिचं कामाचा ढीग पडला आहे. तिने बॉसला सांगितलं की, तिच्या सुपरवायजरने तिला कधीही कोणतेही काम दिले नाही. तिचे सहकारी आणि मार्गदर्शक यांनी तिला दिलेले काम ती पूर्ण करत आहे. यासोबतच बॉसने टॉयलेट ब्रेकबाबतही तिच्याकडे विचारणा केली. तरुणीने पुढे सांगितले की, तिच्या मॅनेजरने टॉयलेट ब्रेक घेत ती बराच काळ गायब असल्याचाही आरोप केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :