Trending Resignation Letter : फक्त तीन शब्द लिहून सोडलं नोकरीवर पाणी, राजीनाम्याचं पत्र व्हायरल
Viral Resignation Letter : एक राजीनामा पत्र सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. विशेष म्हणजे या पत्रात फक्त तीन शब्द लिहिण्यात आले आहेत. हे पत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
Viral Resignation Letter : बहुतेक लोक त्यांच्या नोकरीबाबत पूर्णपणे समाधानी नाहीत. अनेक जण चांगलं पॅकेज असणारी नोकरी मिळवण्याच्या प्रतिक्षेत असून नावडत्या नोकरीपासून पळ काढतात. प्रत्येक जण चांगली नोकरी मिळावी यासाठी अनेक अॅप्लिकेशन लेटर (Application Letter) तयार करतात. नोकरी सोडताना प्रत्येकाला राजीनामा पत्र (Resignation letter) द्यावं लागतं. तुम्ही आतापर्यंत साध्या आणि ठरलेल्या प्रकाराचं राजीनामा पत्र पाहिलं असेल. पण आम्ही तुम्हांला सर्वात गंमतीदार आणि छोटं राजीनामा पत्र दाखवलं आहे.
पण सध्या व्हायरल होणारं राजीनामा पत्र पूर्णपणे वेगळं आणि हटके आहे. हे एक राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यात फक्त तीन शब्द लिहिलेले आहेत. हे राजीनामा पत्र ठरलेल्या आशयाचं नसून अत्यंत जलद गतीनं लिहिण्यात आलेलं दिसत आहे. हे पत्र पाहून तुम्हीही चकित व्हाल. पत्र पाहून कुणालाही हसू आल्याशिवाय राहवणार नाही. या मजेदार पत्रामध्ये लिहिलं आहे, 'Bye bye Sir'.
Simple. pic.twitter.com/JLGkqzVbP2
— Maphanga Mbuso (@MBSVUDU) June 12, 2022
हे पत्र पाहून यूजर्सकडून मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. पत्र पाहून नेटकऱ्यांनी हसणं अनावर झालं आहे. हे पत्र पाहिल्यावर स्पष्ट होते की नोकरी सोडून गेलेला कर्मचारी एकतर आपल्या नोकरीवर खूप नाराज होता किंवा चांगली नवीन नोकरी मिळाल्याने खूप आनंदी होता.
प्रत्येक जण चांगल्या नोकरीच्या शोधात असतं. पण अनेक वेळा अशी नोकरी मिळणं अशक्य होतं. अशावेळी मिळालेली नोकरी करण्याची वेळ येते. यामुळे तुम्ही नोकरीच्या बाबतीत आनंदी नसता. तुम्ही असं काम आवडीनं करु शकतं नाही. कदाचित तुम्हाला तुमचा बॉस आवडत नसेल. कदाचित तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडणार नाही. किंवा कदाचित कामाच्या ठिकाणचं वातावरण चांगलं नसेल. नोकरी सोडण्यासाठी अशी अनेक कारण असू शकतात. मनासारखी चांगली नोकरी मिळाल्यावर राजीनामा देण्याचा हा प्रकार मात्र हास्यास्पद आहे.