Penthouse : श्रीमंतांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेलं 'पेंटहाऊस' म्हणजे नेमकं काय? वाचा सविस्तर माहिती
Penthouse : पेंटहाऊसमध्ये तुम्हाला फॅन्सी इनडोअर फिटिंग्ज, हाय-टेक कमांड उपकरणे यांसारख्या सुविधा मिळतात.
Penthouse : पेंटहाऊस (Penthouse) हा एक शब्द आहे जो आपण गेल्या काही वर्षांत खूप ऐकला आहे. आपल्याला हा शब्द बहुतेक फक्त श्रीमंत लोकांशी संबंधितच आढळतो. जसे की, सलमान खानने इथे पेंटहाऊस विकत घेतलं, तसेच उद्योगपतीनंही तिथे पेंटहाऊस घेतलं. पण हे पेंटहाऊस नेमकं असतं तरी कसं? हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? सामान्य घरे किंवा बंगल्यांपेक्षा ते किती वेगळे आहे? या ठिकाणी पेंटहाऊस संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
बहुतेकदा पेंटहाऊस हा शब्द राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपती यांच्याशी संबंधित असतो. कारण या पेंट हाऊसच्या किंमती अवाढव्य असतात. ज्या सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाहीत. तसेच, हे पेंटहाऊस खूपच आकर्षक असतात.
पेंटहाऊस काय आहे?
ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार, पेंटहाऊस म्हणजे मोठ्या इमारतीच्या शीर्षस्थानी आरामदायी मोठ्या खोलीचा फ्लॅट. पेंटहाऊसमध्ये 3BHK आणि 4BHK फ्लॅटपेक्षा जास्त जागा असते. यामुळेच बहुतेक श्रीमंत लोक ते विकत घेतात. खरंतर, हा इमारतीतील सर्वात वरचा मजला असतो, ज्यामुळे संपूर्ण इमारतीमध्ये फक्त एक पेंटहाऊस बांधता येतो. यामुळे पेंटहाऊसची किंमत इतर फ्लॅट्स आणि घरांपेक्षा खूप जास्त असते.
पेंटहाऊसमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध असतात?
पेंटहाऊसमध्ये तुम्हाला फॅन्सी इनडोअर फिटिंग्ज, हाय-टेक कमांड उपकरणे यांसारख्या सुविधा मिळतात. यासोबतच लक्झरी बनवण्यासाठी अनेक हायटेक सुविधा जोडल्या गेल्या आहेत. पेंटहाऊसमध्ये, आपल्याला एक आश्चर्यकारक ओपन टेरेस मिळेल, ज्याची मोठ्या शहरांमध्ये राहणा-या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासोबतच अनेक वेळा तुम्हाला पेंटहाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि अप्रतिम टेरेस गार्डन देखील मिळते. या पेंटहाऊसमध्ये जिम, मोठे बाथरूम आणि इतर अनेक सुविधाही उपलब्ध असतात.
पेंटहाऊसची किंमत किती असते?
हाऊसिंग डॉट कॉम या घर विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, जर तुम्हाला मुंबईत पेंटहाऊस घ्यायचे असेल तर तुम्हाला किमान 20 ते 100 कोटी रुपये खर्च करावे लागतात. दुसरीकडे, जर तुम्हाला गुडगाव किंवा नोएडा सारख्या शहरात पेंटहाऊस घ्यायचे असेल तर येथे देखील किंमत किमान 6 ते 12 कोटींच्या आसपास आहे. आजकाल लहान शहरांमध्ये तुम्हाला पेंटहाऊस क्वचितच दिसतात. मुंबई, पुणे, बेंगळुरू, नोएडा या शहरांमध्ये त्याची मागणी खूप जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या :