Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, आणि राहुल गांधींचे 'फ्लाइंग किस'! व्हिडीओ व्हायरल
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुढील दोन आठवडे राजस्थानमध्ये असणार आहे. राजस्थानमधील एकूण 7 जिल्ह्यात ही पदयात्रा जाणार आहे. या दरम्यान 520 किमीचा प्रवास केला जाणार आहे.
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या राजस्थानमध्ये (Rajasthan) आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी अनेक लोकांना भेटतानाचे विविध व्हिडीओ (Viral Video) रोज समोर येत आहेत. असाच एक व्हिडीओ राजस्थानच्या झालावाडमधून समोर येतोय, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
भारत जोडो यात्रेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा झालावाडमधून जात असताना भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या कार्यालयाच्या छतावर काही भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी यावेळी 'मोदी-मोदी' च्या घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावर राहुल गांधी यांनी या भाजप कार्यकर्त्यांना चक्क फ्लाईंग किस केले, राहुल गांधींनी फ्लाईंग किस देताच भाजपा कार्यकर्ते हसू लागले. नेमकं काय आहे या व्हायरल व्हिडीओमध्ये?
ये मीरा बाई का राजस्थान है...कण-कण में प्रेम बसा है और @RahulGandhi जी तो हैं ही प्रेम और अहिंसा के उगते सूरज।#BharatJodoYatra प्रेम-सद्भाव की विरासत लौटा रही है। pic.twitter.com/mt6MU3mpP7
— Congress (@INCIndia) December 6, 2022
राहुल गांधींची 'फ्लाईंग किस' सोशल मीडियावर व्हायरल
राहुल गांधींची ही 'फ्लाईंग किस' सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर करत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील भारत जोडो यात्रेच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी येथील सभेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) वर जोरदार हल्ला चढवला. भाजपवाले 'जय सियाराम का म्हणत नाहीत?', त्यांनी माता सीतेचा नारा का काढला? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.
राहुल यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा
राहुल गांधी यांच्याशी संबंधित असाच एक व्हिडीओ यापूर्वीही व्हायरल झाला होता. मध्य प्रदेशातील आगर माळव्यातून यात्रा जात असतानाचा हा व्हिडीओ होता. तर, राजस्थानमधील भारत जोडो यात्रेच्या पहिल्या दिवशी झालावाडमधून जात असताना झालावाड-बारणचे भाजप खासदार दुष्यंत सिंह यांच्या कार्यालयाच्या छतावर भाजपचे काही कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनी राहुल यांना पाहताच मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर त्या लोकांकडे पाहून राहुल गांधींनी आधी हस्तांदोलन केले आणि त्यांना फ्लाइंग किसही दिली. त्याचवेळी सचिन पायलट आणि मंत्री रामलाल जाट हे राहुल गांधींसोबत होते. राहुल यांनी हात उंचावून त्यांनाही अभिवादन करण्याचे आवाहन केले.
राजस्थानमधील प्रवासाचा दुसरा दिवस
रविवारी संध्याकाळी ही यात्रा मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये दाखल झाली, त्यानंतर सोमवारी सकाळी झालावाडच्या झालरापाटन येथील काली तलाई येथून यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्या दिवशी 21 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तर, राहुल गांधी यांच्या राजस्थान दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून, झालावाडच्या क्रीडा संकुलातून सकाळी सहाच्या सुमारास दौऱ्याला सुरुवात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra and Karnataka Border Dispute: अखेर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा पुढे ढकलला, शंभूराज देसाई यांनी सांगितले 'हे' कारण