(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : गोव्यात मिळतेय 'मद्यचहा', व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित! एकदा पाहाच
Viral Video : गोव्यात सापडलेल्या या अनोख्या चहाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि आकर्षक कॅप्शन लिहिले आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातंय
Viral Video : गोवा (Goa) हे देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अशी अनेक सुंदर ठिकाणे येथे आहेत, जी पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात आणि मंत्रमुग्ध होतात. गोवा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, विशेषतः त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी. मात्र, आजकाल गोव्याची चर्चा आणखी एका कारणाने होत आहे आणि ती म्हणजे (Tea Viral Video) चहा. तुम्ही मसाला चहा, बारबेक्यू चहा आणि अनेक प्रकारच्या चहाबद्दल ऐकले असेल किंवा प्यायला असेल, पण तुम्ही कधी 'मद्यचहा' घेतला आहे का? होय, हा चहा आजकाल गोव्यात मिळत आहे, ज्याला 'ओल्ड मंक टी' म्हटले जात आहे.
Old monk tea in Goa. The end is near!!! pic.twitter.com/1AYI0ikR40
— Dr V (@DrVW30) November 3, 2022
गोव्यात मिळतेय 'मद्यचहा'
माहितीनुसार, गोव्यातील सिंक्वेरिम बीचवर चहा आणि ओल्ड मंक रमचे विचित्र मिश्रण विकले जात आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणून गरम चुलीतून चिमट्याने एक लहान भांडे बाहेर काढतो आणि त्यात काहीतरी ठेवतो, ज्यामुळे लगेच भांड्यात आग लावतो. यानंतर, तो भांड्यात थोडी रम ओततो, ज्यामुळे आग आणखी वाढते. मग तो जळत्या भांड्यात चहा ओततो, ज्यामुळे आग विझते, चहा आणि रम दोन्ही एकमेकांत मिक्स होतात. मग ती व्यक्ती आरामात 'ओल्ड माँक टी' सर्व्ह करते.
कसा बनतोय हा अनोखा चहा
या अनोख्या चहाचा व्हिडिओ @DrVW30 या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि 'गोव्यातील ओल्ड मंक टी. शेवट जवळ आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'हा काय मूर्खपणा आहे', तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, काय विचित्र लोक, लोकांनी त्यात दारू मिसळली.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : पूलाखाली गरीब मुलांना शिकवताना दिसली मुलगी, नेटकरी म्हणाले- 'ही साक्षात सरस्वती!' मन जिंकतोय व्हिडीओ