VIDEO: लग्नासाठी 'या' देशात मुली मिळेना; तरुणींसह महिलांना खरेदी करुन केले जातात अत्याचार
Viral Video: जगात असा एक देश आहे जिथे तरुण मुलींना 25 हजारांत खरेदी केलं जात आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने पुरुष हे महिलांना खरेदी करुन त्यांच्यावर सहन होणार नाही इतके अत्याचार करतात.
Crime News: चीनमध्ये (China) मुलींची तस्करी ही अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही वेळा मुलींचं किडनॅपिंग होतं, तर कधी मुलींची आणि महिलांची खरेदी-विक्री होत असते. यामागे दोन मुख्य कारणं आहेत. यातील पहिलं म्हणजे चीनमध्ये असणारी 'वन चाइल्ड पॉलिसी' आणि दुसरं म्हणजे लोकांचा 'मुलगाच पाहिजे'चा हट्ट. याच कारणांमुळे चीनमध्ये मुलींची लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळेच मुलांना लग्नावेळी मुली मिळणं देखील कठीण होऊन बसतं. आता ही समस्या सोडवण्यासाठी चीनमध्ये शेजारील देशांतून मुली खरेदी करण्याचा व्यापार सुरू आहे.
चीनमध्ये महिलांची विक्री सुरू
या व्यापाराअंतर्गत चीनमध्ये एका मुलीला 25 हजार रुपये देऊन खरेदी केलं जात आहे. याहून भयंकर गोष्ट ही की, गावातील पुरुष महिलांना खरेदी करुन त्यांच्यावर इतके अत्याचार करतात की एका वेळेनंतर ते सहन होत नाहीत. या कटू सत्याचा खुलासा नॉर्थ कोरियातील येओन्मी पार्क नावाच्या मुलीने सोशल मीडियावर केला आहे.
सध्या एका मुलाखतीदरम्यानचा येओन्मीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती म्हणते - "एक चांगलं आणि शांत जीवन जगता यावं यासाठी मी चीनमध्ये आली. उत्तर कोरियामध्ये हुकूमशहा किम जोंग उन याच्या जाचाला कंटाळून मी माझा देश सोडला आणि चीनमध्ये आली. घुसमट दूर करण्यासाठी चीनमध्ये आल्यानंतर इथे त्यापेक्षा वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे."
25 रुपयांत होते मुलींची खरेदी
येओन्मीला वाटलं की उत्तर कोरियात नाही तर किमान चीनमध्ये तरी तिला चांगलं आयुष्य जगता येईल. मात्र, तिचा हा विचार चुकीचा ठरला. कारण चीनमध्ये त्यांची स्थिती उत्तर कोरियापेक्षा वाईट झाली आहे. येओन्मीने सांगितलं की, चीनमध्ये आल्यानंतर ती मानवी तस्करीच्या रॅकेटची शिकार झाली आणि तिथे फक्त तिचंच आयुष्य नाही, तर तिच्या आईचंही आयुष्य उद्धवस्त झालं.
येओन्मीने सांगितलं की, दलालांनी तिच्या आईला 8,500 रुपयांना विकलं. तर येओन्मी तरुण असल्याने दलालांनी तिला 25,000 रुपयांना विकलं.
View this post on Instagram
4 कोटी तरुणांना मिळेना मुली
चीनमध्ये 'एक अपत्य' धोरणामुळे किमान 4 कोटी पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. चीनमध्ये गावात राहणाऱ्या पुरुषांना मुली विकत घ्याव्या लागतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ते मुली विकत घेतात आणि मरेपर्यंत त्यांच्यावर अत्याचार करतात. गावाकडचे पुरुष महिलांवर अमानुष अत्याचार करतात.
येओन्मीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने सांगितलेली सगळी हकिकत ऐकून प्रत्येकालाच धक्का बसला आहे. अनेकांनी हे सत्य समोर आणल्यामुळे येओन्मीच्या धाडसाचं कौतुक केलं. तर काहींचं म्हणणं आहे की, येओन्मी तिच्यावर दया दाखवावी म्हणून खोटं बोलत आहे.
हेही वाचा: