Crime: पाठीचा कणा मोडला, डोकं रक्तबंबाळ केलं; 10 वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर जल्लाद प्रियकराने प्रेयसीला संपवलं
Crime News: भारताप्रमाणेच परदेशातही प्रेमसंबंधातून हत्येची प्रकरणं वाढत आहेत, इंग्लंडमधून नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचं जीवन संपवलं आहे.
Crime News: लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरांनी आपल्या प्रेयसीला (Girlfriend) मारुन संपवल्याची अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील. अशीच एक घटना आता इंग्लंडमधून (England) समोर आली आहे, जिथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला इतक्या दुर्दैवीपणे मारुन संपवलं (Crime) की ऐकूनच तुमच्या अंगावर काटा येईल.
मागील 10 वर्षांपासून हे जोडपे (Couple) रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. यातील प्रियकराचं नाव जेम्स कॅम्पबेल (James Campbell) आहे, तर प्रेयसीचं नाव कोलेट मायर्स (Colette Myers) आहे.
नेमकं घडलं काय?
जेम्स कॅम्पबेल आणि कोलेट मायर्स हे दोघे मागील 10 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. इंग्लंडमधील लेमिंग्टन शहरात ते राहत होते. दोघांमध्ये झालेल्या शुल्लक वादावरुन जेम्स कॅम्पबेलने त्याची गर्लफ्रेंड कोलेटची निर्घृण हत्या केली. कोलेटला मारण्यासाठी जेम्सने बेसबॉल बॅटचा वापर केला.
बेसबॉलच्या बॅटने प्रियकराने प्रेयसीला इतकं मारलं की तिला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर तिची अवस्था पाहून डॉक्टरही थक्क झाले. जेव्हा डॉक्टरांनी कोलेटचं पोस्टमार्टम केलं तेव्हा त्यांना समजलं की, कोलेटच्या मानेतील हाडांना गंभीर दुखापत झाली आहे. तिचा पाठीचा कणा मोडला होता. डोक्याला मार लागल्याने डोकंही फुटलं होतं, त्यामुळे रक्तस्त्राव सुरुच होता.
प्रियकराला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
जेम्सला त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोलेटच्या स्थितीचं वर्णन करताना डॉक्टरांनी सांगितलं होतं की, तिची स्थिती अगदी उंच इमारतीवरून पडलेल्या किंवा वेगवान कारने धडक दिलेल्या व्यक्तीसारखी होती.
कोलेट रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत जेम्सने तिला बॅटने मारहाण केली. कोलेटची निर्घृण हत्या केल्यानंतर जेम्सने दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना सांगितलं की त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका त्यांच्या घरी पोहोचली.
स्वत:ला वाचवण्यासाठी बोलला बरंच खोटं
जेम्सने सुरुवातीला आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं नाकारलं. तिच्या हत्येबाबत तो पोलिसांसमोर वेगवेगळे दावे करू लागला. घटनेच्या आधल्या रात्री ते दोघे एकत्र बसून मद्यपान (Drink) करत असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर पुढे काय झालं ते माहीत नसल्याचं तो म्हणाला.
जेम्स हे देखील म्हणाला की, त्याला वाटलं त्याची प्रेयसी झोपली आहे. तिचं शरीर थंड पडलं होतं, त्यानंतर हे पाहून त्याने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं. जेम्स स्वतःला वाचवण्यासाठी खूप खोटं बोलला. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर संपूर्ण सत्य बाहेर आलं.
जेम्सने कोलेटला एवढ्या वाईट पद्धतीने मारल्याची ही पहिलीच वेळ नाही, असंही सांगितलं जात आहे. त्याने तिच्यावर अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार केले होते. मात्र, प्रेमात असल्याने कोलेटने तिच्या प्रियकराविरुद्ध कधीही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.
हेही वाचा: