Udaipur: लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा; पर प्लेट जेवणाचा रेट ऐकून व्हाल थक्क
Parineeti and Raghav Wedding: राजस्थानच्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे, दरम्यान तेथील जेवणाचे दर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Parineeti and Raghav Wedding: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या उदयपूरमधील (Udaipur) लीला पॅलेसमध्ये (Leela Palace) परिणीती आणि राघव यांचा विवाह सोहळा 24 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
राघव आणि परिणीतीच्या लग्नाची चर्चा केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात होत आहे. हेच कारण आहे की, लोक सध्या त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी आतूर आहेत. आता जे हॉटेल परिणीती आणि राघवने लग्नासाठी बुक केलं आहे, त्याचं भाडं ऐकून तुमच्या भुवया उंचावतील. अशातच जे लोक या हॉटेलमध्ये लग्नासाठी येणार आहेत, त्यांच्या जेवणाचा खर्च किती होईल? याबद्दल जाणून घेऊयात...
'या' हॉटेलमध्ये इतकं काय आहे खास?
'द लीला पॅलेस' हे हॉटेल देशातील सर्वात महागड्या हॉटेल्सपैकी एक आहे यात शंका नाही, परंतु या हॉटेलची सुंदरता आणि तिथल्या सुविधा इतक्या उत्कृष्ट आहेत की तुम्हाला हॉटेलमध्ये पार पडत असलेल्या विवाह सोहळ्याचा खर्च ऐकूनही एतकी चिंता वाटणार नाही. महाराजा सुइट (Maharaja Suite) हा या हॉटेलच्या सर्वात खास रुमपैकी एक रुम आहे. यासोबतच या हॉटेलमध्ये एक बँक्वेट हॉल देखील आहे, ज्यामध्ये सुमारे 200 लोक एकत्र येऊ शकतात. या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे हे संपूर्ण हॉटेल एका तलावाने वेढलेलं आहे.
या हॉटेलच्या बाहेरच्या जागेत 100 लोक आरामात थांबू शकतात. आजकाल राजस्थानमध्ये राजवाड्यांसारख्या हॉटेलमध्ये लग्न करण्याचा ट्रेंड आहे, यातच 'द लीला पॅलेस' या हॉटेलची गणना शाही लग्नासाठी सर्वोत्तम हॉटेल्समध्ये केली जाते. या हॉटेलला न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध ट्रॅव्हल मॅगझिन 'ट्रॅव्हल + लीझर'ने 2019 मध्ये बेस्ट हॉटेल आणि रिसॉर्ट्सचा पुरस्कार दिला होता.
किती आहे एक प्लेट जेवणाचा दर?
वेडमीगुड वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये एक प्लेट व्हेज खाळीचा (Veg Thali) दर 8,000 रुपये आहे. तर, एक प्लेट नॉन-व्हेज थाळीसाठी देखील 8,000 रुपयेच मोजावे लागतात. यासोबतच तुम्हाला प्रत्येक प्लेटवर स्वतंत्रपणे कर (Separate Tax) भरावा लागेल. म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला 200 लोक आले तरी, त्यांना फक्त जेवणासाठीच 16 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )