Viral Video : बापरे! जंगलातला वाघ चक्क शहरात बिनधास्त फिरत होता, पुढे जे काय झाले ते पाहा..
Trending Video : रस्त्यांवर वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
Trending Video : मेक्सिकोच्या रस्त्यांवर वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बंगालचा वाघ मेक्सिकोच्या रस्त्यावर खुलेआम फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वाघाचा हा व्हिडीओ मेक्सिकोमधील टेकुआला राज्यातील नायरितमध्ये कैद करण्यात आला आहे.
व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद
रस्त्यावर फिरणारा हा वाघ तिथून येणाऱ्या लोकांकडे एकटक पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, एक महिला अचानक या वाघाच्या समोर येताच ती घाबरून ओरडू लागते. व्हिडीओमध्ये पुढे बघायला मिळतंय की वाघ रस्त्यात एका जागी बसला आहे जणू तो कोणाची तरी वाट पाहत आहे. थोड्या वेळाने एक माणूस तिथे येतो आणि त्याच्या गळ्यात दोरी बांधतो आणि या प्राण्याला ओढून नेतांना दिसतो.
A Bengal Tiger roaming around town and then gets taken home without any resistance. This happened in Tecuala, Mexico. pic.twitter.com/TtDwbHAjRT
— Amazing Posts (@AmazingPosts_) June 15, 2022
व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले
मेक्सिको सिटीमध्ये फिरणाऱ्या या बंगाल वाघाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ ट्विटरवर सुमारे 15000 वेळा (14.9k व्ह्यू) पाहिला गेला आहे आणि आतापर्यंत त्याला 244 लाईक्स मिळाले आहेत.
संबंधित इतर बातम्या
- Coca Cola Maggie : आता 'कोका कोला मॅगी', मॅगीवरील विचित्र प्रयोगावर नेटकऱ्यांचा संताप
-
Viral Video : गादीवर झोपण्यासाठी हत्तीच्या पिल्लाचे नखरे एकदा पाहाच, तुम्हीही प्रेमात पडाल
-
Viral Video : आजोबांनी कॉपी केली मायकल जॅक्सनची स्टेप, भन्नाट डान्सचा व्हिडीओ एकदा नक्की पाहा
-
जाऊबाई जोरात! मालमत्तेच्या वादावरून दोघींमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकींना नाल्यात लोळवलं